शंकरपूर आजगाव-पाचगाव परिसरात वाघाची धुमाकूळ एक गाय व गोरा ठार
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा शुभम मंडपे यांची मागणी
तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर
शंकरपूर येथून जवडच असलेल्या आजगाव-पाचगाव परिसरामध्ये वाघाची धुमाकूळ आहे व आजगाव येथील शेतकरी नारायण घ्यार यांच्या गाभण गाईवर वाघाने हल्ला करून ठार केले व तसेच आजगाव येथील शेतकरी उमेश देशकर यांच्या शेतातील गोऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले ही घटना काल पहाटे आजगाव-चिचाळा(कु)या रस्त्यावर शेतामध्ये घडली त्यामुळे शंकरपूर आजगाव-पाचगाव परिसरात शेतकऱ्यांमध्ये व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वनविभागाला कळविले असता वनविभागाने येऊन चौकशी केली मात्र अजून कोणतीही उपाययोजना केलेली नाही त्यामुळे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आंबोली ग्राम पंचायतचे सदस्य मा.शुभम मंडपे यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागाने तात्काळ मदत करावी व वाघाची लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे व या घटनेकडे प्रशासनाचे व वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे असा आरोपही केला आहे
मागील एक महिण्याअगोदर चिचाळा (कु) येथील शेतकरी आनंदराव चौधरी यांच्या गाईवर वाघाने हल्ला करून ठार केले होते वनविभागाला वेळोवेळी माहिती देऊनही कोणतीही उपाययोजना केली नाही असा आरोपही आजगाव-पाचगाव व चिचाळा (कु), कोलारी , पांजरेपार व शंकरपूर परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे यांमुळे परिसरामध्ये शेतकर्यांमध्ये व शेतमजुरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व यावर वनविभागाने व प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे यावेळी आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य शुभम मंडपे तसेच नुकसान ग्रस्त शेतकरी नारायण ग्यार व उमेश देशकर ,तथा गौतम धनविजय ग्राम पंचायत सदस्य चिचाळा(कु),किशोर चौधरी , संदेश वाघमारे , राकेश धनविजय व परिसरातील शेतकरी उपस्तीत होते