ताज्या घडामोडी

गडपिपरी येथील ग्राम पंचायत सचिव सौ प्रतिभाताई कन्हाके यांची मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर यांच्या कडे तक्रार

उपसंपादक: विशाल इन्दोरकर

दिनांक १८/११/२१ ला सुधाकर लहानुजी वाकडे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य गडपिपरी यांनी ग्राम पंचायत सचिव सौ प्रतिभाताई कन्हाके यांची संवर्ग विकास अधिकारी चिमुर मार्फत मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर यांना तक्रार केली आहे.


तक्रार अर्जा मध्ये सचिव हे चंद्रपूरवरून येणे जाणे करत असल्यामुळे कार्यालयामध्ये नेहमीच वेळेवर हजर राहू शकत नाही . त्यांना जनतेनी नेहमी कार्यालयात हजर राहायला संगीतले असता ते कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही .त्यामुळे सर्व ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी शासनाने ठरवील्याप्रमाणे वेळेवर हजर रहाणे आणि वेळेवर येणे वेळेवर जाणे असा ठराव मासीक सभेमध्ये सर्वानुमते घेण्यात आला व त्यानंतर तो ठराव लिहीण्यास त्यांना संगितले परंतु सचिव यांनी ठराव लिहीण्यास टाळाटाळ केली त्यानंतर ऑक्टोंबर महिन्यात जी ग्रामसभा घेण्यात आली त्या सभेमध्ये विविध चर्चा करण्यात आल्या .तेव्हाही ठराव सचिवांना लिहीण्यास सांगितले तेव्हाही सचिवाने तो ठराव लिहीण्यास टाळाटाळा केली. त्या सभेमध्ये मि सचिव यांना नवेगाव ब्राम्हण नविन अंगणवाडी विषयी विचारले की नविन अंगणवाडी बांधकामाची देयके कोणाला , कधी किती पैसे दिले मला त्याचे एमबी बिल , साटा रजिस्टर व मजुराचे हजेरी रजिस्टर दाखवा असे विचारले असता त्यांनी एकही दस्ताऐवज उपलब्ध नाही असे सांगितले व मी तुम्हाला एकही दस्ताऐवज दाखवू शकत नाही . तुम्ही माझी तक्रार करू शकता असे त्यांनी मला उत्तर दिले .मी गडपिपरी ग्रामपंचायत सरपंच असताना माझे पद २१/०७/२०२१ ला रिक्त झाले .आणि सचिव यांनी माझी डि.एस.सी लावून १०/०८/२०२१ ला सार्वजनिक नळाचे देयके २,३६,०२१ / – रूपये ची उचल केलेली आहे . तेव्हा माझी आणि शासनाची त्यांनी दिशाभुल केलेली आहे .तरी या सर्व प्रकरणाची योग्य ती चौकशी करून सचिव सौ . प्रतिभा कन्हाके यांच्यावर योग्य ती कार्यावाही करण्यात यावी असे तक्रार अर्जा मध्ये सुधाकर वाकडे यांनी नमुद केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close