ताज्या घडामोडी

बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबियांना आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते धनादेश सुपूर्द

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या येल्ला येथील मृतकाच्या कुटुंबियांना सानुग्रह मदत
आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते पाच लाखाचा धनादेश सुपूर्द
मृतकाच्या कुटुंबियांना हिंम्मत व धीर दिले

मूलचेरा तालुक्यातील लगाम नजीकच्या येल्ला येथील मुत्ता रामा टेकुलवार यांच्यावर त्यांच्याच शेताच्या विहिरीजवळ गेल्या 3 सप्टेंबर रोजी बिबट्याने हल्ला केल्याने ते जागीच ठार झाले होते. मृत्युमुखी पडलेल्या रामा मुत्ता टेकुलवार यांच्या कुटुंबियांना पाच लाखाचा धनादेश शुक्रवार 8 एप्रिल रोजी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सुपूर्द केले.
विशेष म्हणजे घरचा कमावता गेल्याने टेकुलवार कुटुंबीय उघड्यावर पडले होते. मृतकाच्या कुटुंबियांना आधार आणि आर्थिक मदत मिळावे म्हणून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दुर्घटनेच्या दिवसा पासूनच प्रयत्नशील होते. दुर्घटनेच्या वेळी तात्पुरत्या स्वरूपात वनविभागातर्फे आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी आर्थिक मदतही मिळवून दिले होते. आणि त्याचवेळेस शासनस्तरावर पाठपुरावा करून सानुग्रह मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वस्त केले होते.
गत 8 एप्रिल शुक्रवार रोजी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सानुग्रह मदत म्हणून पाच लाखाचा धनादेश मृतक मुत्ता रामा टेकुलवार यांच्या पत्नी शांताबाई टेकुलवार, मुलगा सुरेश व महेश टेकुलवार यांच्याकडे सुपूर्द करून हिंम्मत व धीर दिले.
धनादेश देतेवेळी येल्ला ग्राम पंचायतीचे सरपंचा वैशाली सोयाम, उपसरपंच दिवाकर मडावी, वनपाल मंदेलावार, वनरक्षक आरती मडावी, मलय्या पानेमवार, साईनाथ पानेमवार, पोलीस पाटील शंकर सडमेक, शिक्षक टेकुल, अमित मुजुमदार, मधुकर पानेमवार, महेश बाक्केवार, ईश्वर आलाम, नरेश राऊत, ललिता कोडापे, रामदास टेकुलवार आदी व प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.

दिलेले शब्द पूर्ण केले!
गेल्या 3 सप्टेंबर रोजी येल्ला येथील मुत्ता रामा टेकुलवार बिबट्याच्या हल्ल्यात जागीच गतप्राण झाल्याने आणि घरचा कमावता इसमाचे जीव गेल्याने टेकुलवार कुटुंबीय संकटात सापडले होते.
या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन त्याचवेळेस आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी ताबडतोब वनअधिकाऱ्यांशी चर्चा करून मृतकांच्या कुटुंबियांना तूर्तास मदत व बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी निर्देश दिले होते. आणि विशेष म्हणजे टेकुलवार कुटुंबियांना शासनाकडून सानुग्रह मदत मिळवून देण्यासाठी आश्वासनही दिले होते. शुक्रवारी आश्वासनाची पूर्ती झाली असून शासनदरबारी पाठपुरावा करून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने येल्ला व परिसरातील ग्रामस्थ समाधान व्यक्त केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close