ताज्या घडामोडी
“त्या” पिडीत मुलीच्या परिवाराला आर्थिक मदत द्या – नारीशक्तीचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील मौजा जारावंडी येथे दि.9.3.2024 रोजीआदिवासी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पिडीत मुलीला व त्यांच्या पालकांना आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी यासाठी नारीशक्ती संघटनेच्या एका शिष्टमंडळाने दि. 11 मार्च 2024 ला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे कार्यालयात एक लेखी निवेदन सादर केले आहे.निवेदन सादर करताना शिष्टमंडळात जयश्री येरमे,रेखा तोडासे,लक्ष्मी कन्नाके,ज्योती जुमनाके,शालिनी पेंदाम, विद्या दुर्गा,रोहिणी मसराम, मालता पुडो,माधुरी पडोटे आदिं नारीशक्तीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.