डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
तेहतीस कोटी युनी मध्ये फक्त आणि फक्त मनुष्य च असा एकमेव प्राणी आहे की ज्याला बोलता येतं, भावना व्यक्त करता येतात, जो दुसऱ्याच्या भावना समजून घेऊ शकतो. एवढ्या उच्चस्तरावर असणाऱ्या मानवी जीवन लाभलेल्या सर्व मनुष्यांनी परोपकारी जीवन जगले पाहिजे. माणूस हा समाजशील प्राणी आहे समाजामध्ये जीवन जगत असताना माणसाने सर्व प्राणीमात्रावर दया क्षमा याचना केली पाहिजे माणूस हा भावनावश प्राणी असून सर्व प्राणिमात्रांच्या भावना समजून त्याने इतरांवर उपकार, माया आणि प्रेम केलं पाहिजे, इतरांची मदत केली पाहिजे, जीवन जगत असताना परोपकारी जीवन जगले पाहिजे,प्रत्येक माणूस समाजाचे देणे लागतो या भावनेने प्रत्येकाने इतरांना मदतीचा हात दिला पाहिजे अशीच मदतीची भावना ठेवणारे बीड जिल्ह्यातील खालापुरी चे भूमिपुत्र डॉ.जितीनदादा वंजारे खालापुरीकर यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन मुंबई येथील प्रसिद्ध दैनिक – दैनिक लोकांकीत चे संपादक संजय पवार यांनी व त्यांच्या टीम ने आयोजित केलेल्या “राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार”सोहळा साठी डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापुरीकर यांना यंदाचा ‘समाजरत्न पुरस्कार’ जाहीर केला आहे.
डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापुरीकर हे महाराष्ट्राच्या बीड सारख्या जिल्ह्यामध्ये खालापुरी या ग्रामीण भागांमध्ये राहत असून ते वेळोवेळी गोरगरिबांची सेवा करतात,ते एक डॉक्टर असल्याकारणाने रात्री-अपरात्री रुग्णांना योग्य व निकडीची सेवा देतात, डॉक्टर जीतीनदादा वंजारे हे गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक, राजकीय व वैद्यकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग अशा पद्धतीचा व्यक्तिमत्त्व आहे. सामाजिक कार्यामध्ये सतत मदतीची भावना ठेवणारे डॉक्टर जितीन वंजारे हे त्यांचा वाढदिवस अनाथाश्रमात साजरा करतात,गोरगरिबांना अन्नदान करून विविध सन ,जयंत्या आणि वाढदिवस साजरा करतात. धरणी मातेची सेवा म्हणून वृक्ष लागवडीचे कार्यक्रम घेऊन, रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेतात व विद्यार्थ्यांना खाऊ फळे वाटप करून आणि वह्या पुस्तके वाटप करून व शैक्षणिक साहित्य वाटप करून विविध सामाजिक उपक्रमांनी ते त्यांचा वाढदिवस साजरा करतात शिवाय करोना सारख्या महामारी मध्ये मोफत राशन, किराणा, अनाथांना अन्नदान व गरजवंत लोकांना जाण्यासाठी गाडी खर्च सुद्धा त्यांनी कोरोना काळामध्ये दिला होता. तसेच मोफत आरोग्यतपासणीशिबिरराबवलीहोती ज्याकाळात डॉक्टर रुग्णांना तपासन्यास घाबरतअसत अश्या काळात मोफत सेवा दीली. डॉ जीतीन दादा वंजारे खालापूरीकर हे सामजिक राजकीय व्यक्तिमत्व असल्या कारणाने त्यांनी विद्यार्थी, शेतकरी, डॉक्टर, व सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी शासन दरबारी विविध आंदोलनं, रास्तारोको, निवेदने आणि उपोषणे केली आहेत. या सर्व कामाचा आढावा घेऊन दैनिक लोकांकित चे मुख्य संपादक सन्माननीय संजय पवार सर व त्यांच्या टीमने डॉक्टर जितीन दादा वंजारे खालापूरीकर यांना मानाचा सामाजिक कार्यातला असणारा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण मुंबई (पनवेल) येथिल नामांकित हॉटेल रेडविंग कॅस्टल येथे दिनांक२९ मे २०२२ रोजी मोठ्या थाटात संपन्न होणार असून या निवडीबद्दल समाजातून सर्वच स्तरातून डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापुरीकर यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.