स्री मुक्ती परिषदेला सर्वजित बन्सोडेंसह अनेक मान्यवरांची उपस्थिती

बुध्द भिम गितांचाही पार पडला एक संगितमय कार्यक्रम
वंचित बहुजन महिला आघाडीचे आयोजन
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने नुकतीच चंद्रपूर शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात स्त्री मुक्ती परिषद पार पडली.या आयोजित परिषदेचे अध्यक्षस्थान वंचितच्या महिला आघाडी महानगर अध्यक्षा तनूजा रायपूरे यांनी विभूषित केले होते.सदरहु कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वंचितचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बन्सोडे, जिल्हाध्यक्ष भूषण फूसे ,बंडूभाऊ नगराळे ,बंडूभाऊ ठेंगरे, मधू वानखेडे,लता साव ,इंदूताई डोंगरे, अधिवक्ता श्रध्दा गोवर्धन, सुजाता लाटकर,निशा ठेंगरे,आदीं उपस्थित होते. 🔳२५डिसेंबरला स्री मुक्ती दिन म्हणून घोषणा करावी असे आवाहन उपस्थित मान्यवर मंडळींने या वेळी बोलताना केले. 🔳कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण सुलभा चांदेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुरेख संचालन मोनाली पाटील यांनी केले.उपस्थितीतांचे आभार संध्या मेश्राम यांनी मानले. 🔳कार्यक्रमाला वंचित बहुजन महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 🔳रात्रीला हिमांशू रंगारी प्रस्तुत चांदण्याची छाया हा बुद्ध भिम गितांचा एक संगितमय कार्यक्रम पार पडला.