ताज्या घडामोडी

महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

तालुका प्रतिनिधी : ग्यानीवंत गेडाम वरोरा

महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचा वाढदिवस जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून कार्यकर्त्यांनी साजरा केला.
रविवारी सकाळपासूनच लाडक्या खासदाराच्या घरी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रांग लागली होती. यावेळी त्यांच्या कार्यालयात शुभेच्छांचा वर्षाव धानोरकर दाम्पत्यावर करण्यात आला त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई धानोरकर त्यांचे पुत्र मानस व पार्थ आणि परिवारातील आप्त मंडळी उपस्थित होते.
सरकार ग्रुप चे अध्यक्ष कासिफ खान यांच्यातर्फे आयोजित 30गरजु मुलींना सायकल वाटपाचा कार्यक्रम रत्नमाला चौकात करण्यात आला. यावेळी तालुक्यातील कोविडमधील मृत परिवारातील मुलींना शाळेत जाण्यासाठी या सायकली वाटप करण्यात आल्या. मित्र परिवारातर्फे सॅनिटायझर व मास्क वाटण्यात आले.हॉटेल ग्रीन लँड चे उद्घाटन यावेळी करण्यात आले. भद्रावती येथे भद्र नाग युथ ग्रुप तर्फे अपंगांना तीनचाकी सायकलींचे वाटप करण्यात आले .चंद्रपूर येथील दुर्गापूर येथे गरीब व गरजू महिलांना वस्त्र वाटप करून कार्यालयात लाडू तुला करण्यात आली. त्यानंतर चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खासदाराच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून जिल्ह्यातील प्रतिष्ठित व राजकीय मान्यवरांनी खासदाराच्या कार्यालयात शुभेच्छांचा वर्षाव केला होता. कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी शुभेच्छा फलक लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.प्रत्येक जण सोशल मीडियावर खासदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पोस्ट टाकत होते.चंद्रपूर, आर्णी लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम राबवत महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचा वाढदिवस मतदार संघात जल्लोषात साजरा करण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close