ताज्या घडामोडी

वाघाळा-मुदगल रहदारीच्या मार्गावर विजेचा खांब झुकला;अप्रिय घटनेची शक्यता;विजवितरण अधिकाऱ्यांचे जाणिव पुर्वक दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी तालुक्यातील वाघाळा-मुदगल हा प्रचंड रहदारीचा मार्ग असुन मागील काही महिण्या पासुन या मार्गावर वंजारवाडी जवळ विज प्रवाह सुरू असलेला विजेचा खांब एवढा झुकला आहे की मोठे वाहन कसरत करून या ठिकाणाहुन काढावे लागत असून एस टी महामंडळाने पाथरी-अंबेजोगाई बस बंद केली असून विज वितरण कंपणी एखादी अप्रिय घटना होण्याची वाट पहात आहे का? असा संतप्त सवाल नागरीक उपस्थित करत आहेत.
प्रस्तावित राष्ट्रिय महामार्ग ५४८ बी ची अतिषय दयनिय अवस्था झाल्याने वाघाळा-मुदगल या मार्गाचा वापर प्रवाशी करतात त्या मुळे या मार्गाने चोविस तास प्रचंड लहान मोठी वाहने धावतात. मात्र मागिल दोन तीन महिण्या पासुन या मार्गावरील वंजारवाडी नजीक रस्त्याच्या कडेला असलेला विजेचा खांब अगदी रस्त्यावरच झुकलेला असून पाऊस आणि वारे झाले तर कुठल्याही क्षणी हा खांब कासळून जिवित हानी होण्याची शक्यता असून. या विषयी नागरीकांनी वेळो वेळी पाथरीच्या विजवितरण अधिका-यांना तोंडी कळऊन ही या गंभिर प्रकरणी संबंधित जाणिव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीक करत आहेत. सोमवार ३ जुलै रोजी मुदगलचे सरपंच कांतराव तिडके यांनी विजवितरण अधिका-यांना प्रत्यक्ष या ठिकाणी परिस्थिती दाखऊन ही कोणतीही हालचाल केली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
अशा परिस्थिती मुळे पाथरी आगाराने काही अनर्थ घडू नये म्हणून वाघाळा मार्गे जाणारी पाथरी-अंबेजोगाई एस टी बस बंद केली असून. या मुळे वाघाळा शाळेत शिक्षणा साठी येणा-या मुला मुलींना पायपिट करावी लागत आहे. पाउस नसल्याने नवखे वाहन धारक रस्याच्या बाजून येत पुढिल प्रवास करत आहेत. मात्र पाऊस पडल्यास अशी वाहतुक बंद होणार आहे. आगोदरच दोन वर्षा पुर्वी थातुर मातुर तयार केलेला हा मार्ग खड्यां मुळे पुन्हा चर्चेत असतांना आता मागिल दोन तीन महिण्या पासुन विज प्रवाह असलेला खांब अर्धा अधिक झुकल्याने प्रवाशी वाहनावर जर कोसळला तर नुकताच बुलढाना येथे जसा अपघात झाला त्याची पुनरावृत्ती होऊ शकते अशा प्रतिक्रीया प्रवाशी आणि वाहन धारक व्यक्त करत आहेत. या विषयी वाघाळा येथील सामाजिक कार्यकर्ते मदनराव घुंबरे पाटील मुदगलचे सरपंच लक्ष्मणराव तिडके हे वारंवार विजवितरण अधिकारी यांना कल्पना देत हा खांब बदलण्याची मागणी करत असतांना त्यांना या कामी थंड प्रतिसाद मिळत असल्याचे ते सांगत आहेत.या विषयी तेजन्यूजने विजवितरण अधिकारी कर्मचारी यांना भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला असता ते नॉट रिचेबल होते.
या महत्वाच्या प्रश्नी आता वरिष्ठांनी लक्ष घालुन भविष्यात या विज खांबा मुळे होणारी जिवित व वित्त हाणी टाळण्या साठी पुढाकार घ्यावा अशी मागणी वाघाळा,मुदगल,वंजारवाडी ग्रामस्थां सह प्रवाशी आणि वाहन धारकां मधून होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close