ताज्या घडामोडी

मजूराचे नवीन पाणीटाकी चे काम करीत असतांना तोल सुटून खाली पडल्याने मृत्यू

ठेकेदाराणे सेफ्टी न बाळगल्याने घडला हा सर्व प्रकार – बबलू शेख (हजरत टिपू सुलतान फाउंडेशन तालुका अध्यक्ष)

तालुका प्रतिनिधी: मंगेश शेंडे चिमुर

दिनांक.१८/१२/२०२१ ला सकाळी ८ ते ९ वाजताच्या दरम्यान नगर परिषद चिमूर च्या ५१ कोटी रुपये नळ योजनेच्या कामावरील मजूराचे नवीन पाणी टाकी चे काम करीत असतांना तोल सुटून खाली पडल्याने उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल केले असता रुग्णाची परिस्थिती अतिशय चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले व नागपूर येथील रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्या मजुराचा मृत्यू झाला.

सहजाद मिया असे मृतक व्यक्तीचे नाव असून वय २७ वर्षे देवापुर बिहार येथील रहिवासी आहे. हा सर्व प्रकार नठेकेदाराणे सेफ्टी न बाळगल्याने घडला असा आरोप बबलू शेख (हजरत टिपू सुलतान फाउंडेशन तालुका अध्यक्ष) यांनी केला असून त्या मजुराच्या घरच्यांना योग्य त्याप्रकारे मोबदला न मिळाल्यास आंदोलन करणार असेही आव्हान करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close