अ.भा.सावित्री ब्रिगेडने घडविली क्रांती

नागपूरात पार पडला भव्य स्री जागृती महिला मेळावा!सिनेट सदस्य शिवानी वडेट्टीवार यांचेसह अनेक महिलांची उपस्थिती!
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
अ.भा. सावित्री ब्रिगेडच्या वतीने नागपूरातील स्मृती सभागृह, अयोध्यानगर येथे नुकताच भव्य स्री जागृती
महिला मेळावा पार पडला.या मेळाव्याच्या प्रास्ताविक भाषणात अ.भा.सावित्री ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या नागपूरच्या मार्गदर्शिका डॉ.स्मिता मेहेत्रे म्हणाल्या, ‘‘प्रबोधनाबरोबरच स्त्रियांना स्त्री-शक्तीची ओळख होऊन त्यांचे सक्षमीकरण व्हावे आणि स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्र गाजवावे,यात जात, पंथ धर्मा
पलिकडे जाऊन प्रत्येक माणसाने सर्वांशी माणसासम वागावे हाच सावित्री ब्रिगेडचा उद्देश आहे.’’
उद्घाटनपर भाषणात विभागीय उपायुक्त,महिला व बालविकास अधिकारी,अर्पणा कोल्हे यांनी स्त्रियांच्या सबलीकरणासाठी विविध योजना असल्याचे प्रतिपादन या वेळी केले. तळागाळातील परंतु स्वकतृत्वाने विविध क्षेत्रात स्वबळावर कार्य करणाऱ्या तसेच ज्यांच्या कार्याची अद्याप पावेतो कोणीही दखल न घेतलेल्या २१ भगिनींचा हिरकण पुरस्कार,गुलाबपुष्प,सन्मानपत्र आणि माहेरची साडी देऊन सत्कार करण्यात आला. या हिरकणींच्या संघर्षाची गाथा ऐकतांना उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रु तरंगले !
यावर्षी प्रथमच सावित्री ब्रिगेडने एक क्रांतीचे पाऊल उचलले,ते असे की किन्नरांची गुरूमां रागिनी जोगिनी यांना हिरकणी पुरस्काराने सन्मानीत केले. या क्रांतीपर्व प्रसंगी,‘‘समाजातील उपेक्षित घटक म्हणून आम्हाला नेहमी झिडकारले जाते .परंतु आम्हालाही मन आहे .याचा आपल्या सावित्री ब्रिगेडनी विचार केला हे आमच्यासाठी खूपच आनंददायी बाब आहे’’ असे रागिनी किन्नर ह्या आपल्या मनोगतात म्हणाल्या.या सत्राचे खुमासदार व सुरेख सूत्रसंचालन प्रणोती कळमकर यांनी केले.
दुसऱ्या सत्रात प्रा.डॉ.सुकेशिनी बोरकर ने.हि.महाविद्यालय,ब्रह्मपूरी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.यात दिग्गज २० कवयित्रींनी वर्णी लावली.त्यांना गुलाबपुष्प,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानीत करण्यात आले. कवीसंमेलनाच्या अध्यक्षा डॉ.सुकेशिनी बोरकर यांनी कवयित्रींनी सामजिक भान ठेवून लेखन केल्यास थोड्याफार प्रमाणात का होईना सकारात्मक परिवर्तन घडून येईल यास वेळ लागणार नाही.असे बोलताना म्हणाल्या.कवीसंमेलनाचे हृदयस्पर्शी सुत्रसंचालन उज्वला पाटील यांनी केले.
तिसऱ्या सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच प्रश्नमंजूषा मध्ये सहभागी सर्व भगिनींना आकर्षक पारितोषिके देण्यात आली. माजी सदस्य जि.प.नागपूरच्या अरूणा मानकर ,अशोक प्रकाशनच्या संचालिका प्रगती मानकर, हुडकेश्वर पोलिस स्टेशन नागपूरच्या सहाय्यक पोलिस निरिक्षक वनमाला पारधी,यांनी उपस्थितीतांना या कार्यक्रम निमित्ताने शुभेच्छा दिल्या. सिनेट सदस्य शिवानी विजय वडेट्टीवार यांनी अ.भा. सावित्री ब्रिगेडच्या विविध उपक्रमात महिलांनी सहभागी होऊन स्वतःतील स्त्रीशक्ती ओळखावी असा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा इरा इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका अनिताताई पांडव यांनी आज महिलांनी प्रतिकार करायला शिकायला पाहिजे असे मत मांडले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व-हाडी शैलीत शितल बनसोड यांनी केले. तर आभारप्रदर्शन संगीता लंगडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सरीता राणेकर,
ॲड.रोमा खंडवाणी,मनीषा गिरडे,विमल वाघमारे, संगिता उपरीकर,शारदा हाडगे,निमा बोडखे,जयश्री मोहितकर,सुनंदा जांबुतकर,विद्या सुरकार,मंगला ठाकरे,नंदा सोनुले,विजयश्री भोंगाडे आदींनी अथक परीश्रम घेतले.