ताज्या घडामोडी

विद्या गजभे अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

उपसंपादकः विशाल इन्दोरकर

सन १९९६ मध्ये इंदौरमधील नागरिकांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने हा पुरस्कार प्रथमता सुरु केला .हा पुररकार दरवर्षी जनसेवेचे विषेश कार्य करणाऱ्यास दिला जातो
भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो नानाजी देशमुखांना दिला होता आज हा पुरस्कार प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत त्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अशा महिलांना दिला जातो की ज्या महिला शशक्तीकरण ,महिला बचतगट,तसेच त्या ग्रामपंचायत हद्दीतील,विधवा परितक्त्या, बचतगट महिलांच्या न्यायहक्कासाठी ज्यांचे काम आहे त्यांना दिला जातो दिनांक ३१ मे २०२३ रोजी हा पुरस्कार एकार्जुना ग्रामपच्यांयतीच्या वतीने विद्या अनंतकुमार गजभे व उषा थेरे यांना देण्यात आला.


यांच्या सामाजिक कामाचा विचार करता यांना अहिल्यादेवी होळकर हा पुरस्कार देण्यात आला त्यांना एकार्जुना ग्रामपंच्यायत च्या सरपंच्या उज्वला थेरे सचिव गुगल मॅडम यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी गावच्या पोलीस पाटील योगिता रणदिवे ग्रामपंचायत सदस्य गावातील ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close