जिल्हास्तरीय मॉंन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि-06/01/2024 रोजी वार शनिवार कै.स.गो.नखाते माध्यमिक विद्यालय देवनांद्रा येथे जिल्हास्तरीय मॉंन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धा उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून माननीय श्री अजिंक्य भैय्या नखाते मॉंन्टेक्स बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच कै.स.गो.नखाते मा. विद्यालय देवनांद्राचे मुख्याध्यापक होगे सर,दुधमोगर भास्कर,प्रभाकर जाधव, रणधीर सोळंके, सचिव भरत घांडगे, पाथरी तालुका क्रीडा संयोजक तुकाराम शेळके याप्रसंगी उपस्थित होते. या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये एकूण सात मुलांच्या संघाने तर चार मुलींच्या संघाने सहभाग नोंदवला. या स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे 19 वर्षे वयोगट मुले कै.स.गो.नखाते मा. विद्यालय देवनंद्रा प्रथम तर शांताबाई नखाते विद्यालय रामपुरी सर्व द्वितीय आणि मुलींमध्ये शांताबाई नखाते विद्यालय कासापुरी सर्वप्रथम तर शांताबाई नखाते विद्यालय पाथरी सर्व द्वितीय वरील खेळाडूंचे अभिनंदन पंच म्हणून कपिल रनर, आकाश चव्हाण, आत्माराम माने, अर्जुन पवार, माऊली ढगे, प्रकाश शिंदे, यांनी काम पाहिले सर्व सन्माननीय पाहुणे मंडळींनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .