तिरखुरा येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

राजमाता जिजाऊ ह्या विचारांनी पुरोगामी व कृतिने खंबीर होत्या-समतादूत प्रज्ञा राजूरवाडे
तालुका प्रतिनिधी : ग्यानीवंत गेडाम वरोरा
राजमाता जिजाऊ ह्या एक आदर्श वीर माता होत्या त्यांच्या कल्पनेतून स्वराज्य प्रस्थापित झाले देशभक्त दूरदर्शी स्वतंत्र विचारसरणी च्या त्या उत्तम प्रशासक होत्या त्यांच्या मायेच्या छायेत सर्वधर्मसमभाव व प्रजेचे सुख त्यानी जोपाशले शिवाजीराजे च्या त्या प्रेरणा व ऊर्जा स्थान होत्या मनानी खूप बलवान व खोट्या परंपरा नष्ट करण्याचे सोशल इंजिनिअरिंग त्यांनी केले होते म्हणून राज माता जिजाऊ ह्या पुरोगामी विचारांच्या व कृतिनी खंबीर होत्या असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी तिरखुरा येथे शिवप्रतिष्ठान आणि डॉ बाबासाहेब युवा विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या की महिला नि राजमाता जिजाऊ चा आदर्श घेतला पाहिजे तरच या देशयाची प्रगती होईल त्याकाळात जिजाऊ नि कधीच आपल्या शिवबाला कुठलेही काम करण्यासाठी महूर्त बघण्याचे धडे दिले नाही अमावस्या च्या दिवशी शिवबानि पहिली लढाई केली व्यवस्थेने खूप मोठी खेळी खेळली होती जर शापित जमिनीवर कोणी नांगर चालवला तर चालवनाऱ्यांचा वंश बुडतो म्हणे ! पण जिजाऊ नि शिवबाच्या हातांनी सोन्याचा नांगर त्या जमिनीवर चालवला व रयतेला सोन्याचे दिवस दिले सतीप्रथा सुद्धा बंद केली होती या व्यवस्थेची सर्व खेळी राज माताजिजाऊना कळली होती म्हणून त्या वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या होत्या शाहजी राजे हे त्यांच्या जवळ राहत नव्हते तरी त्या साहसी वृत्ती च्या होत्या योग्य असे संस्कार व योग्य निर्णय घेण्यास त्या सक्षम होत्या स्वराज्याची स्थापना ही त्यांच्या प्रेरणादायी व दूरदृष्टी व बुद्धिमान विचारांनी झाली सर्वधर्मसमभाव व प्रजेचे सुख काय असते हे त्यांनी कृती नि करून दाखविले जिजाऊ ह्या शिवबाच्या मित्र व मार्गदर्शक बनून शिवबाला संस्कारामंध्ये नैतीक संस्कार देशप्रेम महिलांचा सन्मान समाजाचे संरक्षन करणे न्याय राष्ट्रप्रेम असे विचारदेऊन कायम प्रेरणास्त्रोत बनल्या आपल्या मुलाच्या मित्र व मार्गदर्शन बनून उत्तम संस्कारांची व शौर्य ची वैज्ञानिक दृष्टी ची प्रतिमा प्रत्येक महिलानी बनवून जिजाऊ सारख्या देशभक्त बनावे.

या कार्यक्रमाच्या अद्यक्ष स्थानी शिवप्रतिष्ठान महिला मंडळ च्या पुष्पा नलोडे ,विमल नलोडे, शारदा जाधव ,प्राची डांगे, संजना लोखंडे, अपर्णा डांगे ,शशिकला डांगे, आदि उपस्थित होत्या तर या कार्यक्रमाचे संचालन मयुरी डांगे हिने केले तर आभार सेजल डांगे हिने मानले