परमपूज्य श्री साईबाबा जन्मस्थान मंदिरात मान्यवरांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी शहरातील साईबाबा जन्मस्थान मंदिरात रविवार ३० ऑक्टोबर रोजी मध्यान्न आरती नंतर मान्यवर पत्रकारांचा श्री साई स्मारक समिती पाथरी व्यवस्थापन मंडळाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाची सुरुवात सौ धनश्री जोशी तळेकर यांच्या सुरेल आवाजात शारदास्तवनाने करून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमात वर्षभर श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर समितीच्या वतीने राबण्यात आलेल्या विविध कार्यक्रम आणि उपक्रमांना मोठ्या प्रमाणात सतत प्रसिद्धी देणारे पत्रकार किरण घुंबरे पाटील, गणेश जत्ती, विलास बारहाते, धनंजय आडसकर, दत्ता उफाडे आदी मान्यवर पत्रकारांचा सत्कार व्यवस्थापन मंडळाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी एन के कुलकर्णी यांनी केला.
तसेच मागील तेरा वर्षापासून साई सेवा म्हणून रामभाऊ कोक्कर यांनी दिपावली पाडव्यानिमित्त सामुहिक दिपोत्सवाची परंपरा सुरू केली तीच परंपरा पुढे चालू ठेवत अंजली समूहाच्या श्रीमती तनुजा कोक्कर आणि अंजली हॉटेलचे मालक रवी भैया कोक्कर व रोहित भैया कोकर यांनी दिपोत्सव साजरा केला त्याबद्दल व्यवस्थापन मंडळाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी एन के कुलकर्णी यांनी कोक्कर कुटुंबीयांचा यथोचित सत्कार केला.
या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचे दीपक काकडे यांनी उत्कृष्ट असे व्हिडिओ शूटिंग केले त्याबद्दल समितीच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अॅड बालासाहेब तळेकर यांचा तसेच धनश्री जोशी तळेकर यांचाही सत्कार समितीच्या वतीने करण्यात आला.
समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन के कुलकर्णी यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध ज्येष्ठ अॅडव्होकेट बालासाहेब तळेकर यांनी केले. सौ धनश्री जोशी तळेकर यांच्या मधुर आवाजात पसायदानाने सदर कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
दीपावलीनिमित्त सत्कारमूर्तींना अल्पोपहार व चहापान करण्यात आले. कार्यक्रमास समितीचे प्रताप आमले, प्रभाकर पाटील, कलाबाई कांबळे, योगेश गुरु इनामदार, अजय गुरु पाथ्रीकर, सुधाकर बेदरे, विष्णू शिंदे, मारोती चिंचाणे, मोहन पोपळघट, कलाबाई कांबळे, कमलबाई तेलंगे, सेक्युरिटी गार्ड गोविंद पाथरीकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. असे मंदिर प्रमुख सौ छाया कुलकर्णी यांनी सांगितले.