ताज्या घडामोडी

नगर परिषद ला मुख्याधिकारी तसेच राज्यसंवर्ग कर्मचारी पूर्णवेळ मिळणेबाबतचे शफिक उर्फ पप्पू शेख यांनी उप विभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

नगर परिषद चिमूर ला गेल्या ऑगस्ट २०२० पासून तर आजपर्यंत पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने नगर परिषद चिमूर ला सन २०२० या वर्षापासून अतिरिक्त पदभार मुख्याधिकारी नगर परिषद वरोरा यांचेकडे असल्याने मुख्याधिकारी नगर परिषद चिमूर ला आठवड्यातुन एकच दिवस नगर परिषद ला वेळ देत असतात त्यामुळे जनतेची विविध कामे ठप्प पडलेली आहे.वेळेवर कुठल्याही समस्या चे निवारण होत नाही.वाढत असलेल्या रोगाची लक्षणे यावर मात करण्यासाठी नगर परिषद अकार्यक्षम ठरते आहे.बघावे त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात नगर परिषद अकार्यक्षम दिसून येत आहे.जनतेला कुठल्याही कामाकरिता मुख्याधिकारी यांची आठवडा भर वाट बघावे लागते.तसेच प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने नगर परिषद चिमूर ला राज्य संवर्ग कर्मचारी यांचे आकृतिबंध मंजूर असून मंजूर आकृतिबंधानूसार नगर परिषद ला कर्मचारी उपलब्ध नाही.त्यापैकी स्थापत्य अभियंता श्रेणी ब चे १ पद , कर निर्धारन प्रशासकीय सेवा श्रेणी ब चे २ पदे ,जलाशय मलनिस्सारण स्वच्छता अभियांत्रिकी श्रेणी क चे १ पद तसेच नगर रचनाकार श्रेणी क चे १ पद असे एकूण ५ पदे रिक्त आहेत ती भरण्यात यावी जेणेकरून प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू राहील जनतेला कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह भूमिका दिसणार नाही म्हणून पूर्णवेळ मुख्याधिकारी नगर परिषद चिमूर ला देण्यात यावे.याकरिता उप विभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री , नगर विकास मंत्री , पालकमंत्री , जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देते वेळी पप्पू शेख , गौतम पाटील , प्रदीप तळवेकर उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close