ताज्या घडामोडी

समाज सुधारणा करणे ही सामुहिक जबाबदारी-हभप त्र्यंबक महाराज दस्तापुरकर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

एका एका व्यक्ती पासून समाज बनतो. समाज सुधारणा करणे फक्त संत, महाराज लोकांची जबाबदारी नसून ही सामूहिक जबाबदारी आहे असं मत हभप त्रिंबक महाराज दस्तापुरकर यांनी गुरुवारी बोथी येथे कीर्तनात बोलताना व्यक्त केल.

श्री विठ्ठल कृपा मोतीराम महाराज आश्रम बोथी या ठिकाणी कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. मावंदे व विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या बांधकामाच्या शुभारंभ उपस्थित महाराजांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करून करण्यात आला. या आश्रमाचे मठाधिपती ह भ प विलास महाराज गेजगे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गुरुवारी या ठिकाणी ह-भ-प त्र्यंबक महाराज दस्तापुरकर, माऊली महाराज मुडेकर यांचे कीर्तन झाले. संत संगतीचे काय सांगु सुख या अभंगाचे निरुपण करत पुढे बोलताना दस्तापुरकर महाराज म्हणाले की संत कुणाचाही तिरस्कार करत नाहीत. एखाद्या वेळेस देव भेदभाव करेल पण संत भेदभाव करत नाहीत. पुढच्या काळात माणूस व्हायला शिकणे गरजेच आहे. समाज सुधारणा करणं ही सामूहिक जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी झटकून समाज सुधारणा होणार नाहीत. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे अनुकरण कुटुंबातील लोक करत असतात. त्यामुळे समाजात वावरताना कुटुंब प्रमुखाची भूमिका महत्त्वाची आहे. एखादा माणूस मोठा कसा झाला, श्रीमंत कसा झाला असं पाहण्याऐवजी किंवा असं बोलण्या ऐवजी त्यांचे कमवण्याच्या पूर्वीचा त्यागाची चर्चा करणे आवश्यक असल्याचेही महाराज म्हणाले. यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर,मुंजा लांडे, दत्ता सोलव आदी सह गुनीजन गायक, मृदंग वादक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सदाशिव कुंडगीर, वैजनाथ राऊत, गिरजाप्पा हेळमकर, ज्ञानोबा गोरगे, बाबुराव थावरे ,दामोदर बोंनर आदीसह परिसरातील भाविक भक्तांनी प्रयत्न केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close