ताज्या घडामोडी

आष्टी – गोंडपिपरी मार्गावर भंगाराम तळोधी क्रॉसिंगवर दुचाकीचा अपघात दोन जखमी

तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपीपरी

दिनांक 7 जानेवारी रोज शुक्रवार ला आष्टी-गोंडपीपरी मार्गावर विठ्ठलवाडा गावालगत भंगाराम तळोधी टर्निंग पॉइंटवर दुचाकीचा अपघात घडला.
या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.
जखमी मध्ये 12 वर्षीय बालकाचा समावेश आहे.
गोंडपिपरी मार्गे आष्टी कडे जाणाऱ्या दोन दुचाकी मध्ये अपघात घडला.या मध्ये कवडजी मानोरा येथील तीन युवक गोंडपीपरी मार्गे आष्टि कडे दुचाकीने येत होते.तर याच मार्गांनी पाठोपाठ गोंडपीपरी हुन भंगारपेठ येथे जाणारी दुसरी दुचाकी येत होती. विठ्ठलवाडा गावाजवळ येताच तळोधी कडे जाणार्या टर्निंग कडे वाहन येताच दुचाकींचा अपघात घडला.
यात दोघे जखमी झाले असून यात एका लहान बालकाचा पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
सदर घटनेची माहिती गोंडपीपरी पोलीस स्टेशन ला देण्यात आली असता पोलिस कर्मचारी घटनास्थळी येवून जखमीला ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे उपचाराकरिता हलविण्यात आले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close