ताज्या घडामोडी
पुरस्कार महाराष्ट्राचा -गौरव कर्तृत्वाचा पुरस्काराने अधीसेविका वंदना बरडे सन्मानित

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
फिल्म जगत मधील सुपरिचित अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या प्रमुख उपस्थितीत अधीसेविका वंदना विनोद बरडे यांना “पुरस्कार महाराष्ट्राचा -गौरव कर्तृत्वाचा “ह्या सन्मान पुरस्कारांने नुकतेच गौरविण्यात आले .
हा पुरस्कार समारंभ नागपूर स्थित कोणार्क हाँटेलमध्ये पार पडला .सदरहु कार्यक्रमाचे आयोजन अविनाश बडगे यांनी केले होते.सदरहु कार्यक्रमात ५०व्यक्तींना सन्मानित करण्यात आले .
आरोग्य सेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या वरोरा येथील अधीसेविका वंदना बरडे यांना फिल्म अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या हस्ते उपरोक्त पुरस्कार देण्यात आला.यावेळी वंदना बरडे यांनी अवयव दान, नेत्र दान, देह दान,व रक्त दान करण्याचें आवाहन केले.तर फिल्म अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकला .