चिमुर येथे वाहतुकीचे नियमांसबंधाने नागरीकांमध्ये जनजागृती करण्याकरीता रॅलीचे आयोजन

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
दिनांक 10/12/2021 रोजी सकाळी 11/00 वा. पोलीस स्टेशन चिमुरच्या वतीने श्री. संत भैय्युजी महाराज उच्च माध्यमिक शाळा, चिमुर येथील विद्यार्थी/विद्यार्थींनी यांचे सहकार्यातुन पोलीस स्टेशन चिमुर ते हजारे पेट्रोलपंप चौक पर्यंत वाहतुकीचे नियमांसबंधाने नागरीकांमध्ये जनजागृती करण्याकरीता रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीमधील एकुण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरीकांकरीता जोर जोराने घोषवाक्ये दिली. हजारे पेट्रोलपंप चौकामध्ये विद्यार्थ्यांचे हस्ते पोलीस स्टेशन चिमुरच्या वतीने नागरीकांना वाहतुक नियम पाळण्याबाबत करण्यात आलेल्या आवाहनाचे पाम्प्लेटस वाटप करण्यात आले.

दिवसेंदिवस वाढ होत असलेल्या रस्ते अपघातांवर प्रतिबंध व्हावा व अपघातातील मृत्युचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने पोलीस निरीक्षक मनोज गभने पो.स्टे. चिमुर यांचे संकल्पनेतुन शाळकरी मुलांच्या माध्यमातुन रॅलीचे आयोजन करण्यात आले असुन सदर रॅलीकरीता श्री. संत भैय्युजी महाराजचे मुख्याध्यापक श्री. एस. बी. पिसे, श्री. आर. के. पंधरे, श्री. एम. एच. शिवरकर, सौ. वि. बि. गजभिये त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन चिमुरचे पोलीस निरीक्षक श्री. मनोज गभने, पोलीस उपनिरीक्षक श्री. अलिम शेख, सहाय्यक फौजदार विलास सोनुले, पोलीस नाईक कैलास आलाम, पोलीस अंमलदार राहुल चांदेकर तसेच वाहतुक शाखेचे पोलीस अंमलदार दिलीप वाळवे, सुखराज यादव, रामेश्वर डोईफोडे, नितेश गुडधे यांनी उपक्रमात सहभाग घेतला.