इतिहास अभ्यास मंडळावर नियुक्ती बद्दल प्रा डॉ मुसळे यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी येथील स्व नितीन महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रा डॉ हनुमान मुसळे यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या मानव्यविद्या शाखा अंतर्गत इतिहास विभागाच्या अभ्यास मंडळावर ३१ ऑगष्ट २०२७ पर्यंत कुलगुरू यांनी ही नियुक्ती केल्याचे पत्र कुलसचिव डॉ सर्जेराव आर.शिंदे यांच्या स्वाक्षरीनिशी प्राप्त झाले आहे.
प्रा डॉ हनुमान मुसळे यांच्या नियुक्ती बद्दल स्व नितिन महाविद्यालयात त्यांचा प्राचार्य डॉ आर एस फुन्ने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी उपप्राचार्य डॉ सुरेश सामाले, प्रा डॉ भारत निर्वळ,प्रा डॉ जे एम बोचरे,प्रा डॉ मधूकर ठोंबरे,प्रा तुळशिदास काळे,ग्रंथपाल डॉ कल्याण यादव,प्रा डॉ संदिप जाधव,प्रा डॉ सुंदर गजमल,प्रा डॉ साहेब राठोड,प्रा डॉ आनंद इंजेगावकर,प्रा रणजित गायके,प्रा डॉ अंकूश सोळंके,प्रा डॉ आर एम जाधव,किरण घुंबरे पाटील,संतोष रोडगे,माधव नखाते यांनी या वेळी नियुक्ती बद्दल शुभेच्छा दिल्या.