ताज्या घडामोडी

खासदार अशोक नेते यांच्या विशेष प्रयत्नाने भामरागड नगरपंचायत विकास कामाला दोन कोटी चाळीस लक्ष रुपये निधी मंजूर करून भूमिपूजन व विकास मेळावा संपन्न

जनतेच्या विकास कामासाठी माझा विशेष प्रयत्न,विकास कामे हाच ध्येय खासदार अशोक नेते

खा.अशोक नेते यांचे ढोल ताशांच्या व फटाके च्या आतिषबाजीने विकास मेळाव्याचे जल्लोषात स्वागत..

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

भामरागड तालुक्यातील भामरागड येथे नगर पंचायत विकासासाठी खासदार अशोकजी नेते यांनी विशेष प्रयत्न करून दोन कोटी चाळीस लक्ष रुपयांचा विकास निधी मंजूर करून आज दिं.१६ ऑक्टोंबर ला विविध प्रभागातील मंजुर विकास कामाचे भूमिपूजन व विकास मेळावा खासदार अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते हनुमान मंदिराच्या पटांगणावर भामरागड येथे ढोल ताशांच्या गजरात व फटाके च्या आतिषबाजी ने जल्लोषात स्वागत करत विकास मेळावा संपन्न झाले.

यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी उद्घाटन प्रसंगी बोलतांना तालुका भामरागड हा भाग अति दुर्गम भाग म्हणुन ओळखला जातो,याकरिता या भागात नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण विशेष प्रयत्न करुन नगरपंचायत ला विकास कामाला दोन कोटी चाळीस लक्ष रुपयांचा निधी माझ्या प्रयत्नाने मंजूर झाला.जनतेच्या विकास कामासाठी माझा विशेष प्रयत्न,विकास कामे हाच ध्येय आहे. यावेळी शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजना विषयी विस्तृत माहिती देत या विकास कामाचा निश्चितच यांचा फायदा नागरिकांना होईल यांचा चांगला लाभ नागरिकांनी घ्यावा.असे प्रतिपादन याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.

याप्रसंगी भामरागड तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मोठया संख्येने नागरिक भाजपा पक्ष प्रवेश केला.तेव्हा राजेंद्र तानसेन, शंकर मादावार,श्यामराव कटकेल,नारायण दुंडलवार,सचिन चौधरी, समया कुकरवार, ओमकार पुजलवार,सुरेश कुरसय,गंगाराम आत्राम,योगेश मुरकेल,तुलसीराम दरमसोद, किशोर दुर्गे, शंकर मादावार, शोतया ऊमरवार,दशरथ आजमेरा,सम्या गावडे इत्यादींनी पक्ष प्रवेश केला.या प्रसंगी आशा वर्कर च्या मानधन वाढीबाबत व तालुक्यातील समस्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने मंचावर खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे,नगराध्यक्षा रामबाई महाका( हलदार), भाजपा नेते तथा स्वीकृत नगरसेवक सुनिल बिशवास,शहराध्यक्ष सम्राट मलिक,माजी नगरसेवक प्रा.चालुरकर,माजी जि.प.सदस्य जाकिर हुसेन,अल्पसंख्याक अध्यक्ष शकिल शेख,ता.उपाध्यक्ष जाधव हलदार,महिला आघाडी जि.उपाध्यक्ष भारती ईसटाम, महामंत्री अनंत बिशवास, नगरसेवक दलसु सळमेक, नगरसेवक दिलिप उईके, नगरसेविका लक्ष्मी आत्राम,बुथ अध्यक्ष प्रदिप मडावी,आशा वर्कर तसेच तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close