ताज्या घडामोडी

श्री साई कॉन्व्हेन्ट व जिवीका इंग्लिश मिडीयम स्कूल भिसी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव संपन्न

विद्यार्थ्यांनी लुटला दहिहंडी चा आनंद .

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

चिमूर तालुक्यातील मौजा भिसी येथे श्री साई कॉन्व्हेन्ट व जिवीका इंग्लिश मिडीयम स्कूल, मध्ये दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहिहंडी चा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता . दहिहंडी फोडण्याच्या कार्यक्रमामध्ये मुले तसेच मुलींचे सुद्धा गृप सहभागी झाले होते विशेष म्हणजे मुलिंच्या ( गोविंदा ) पथकाने तिन थर लावून दहिहंडी फोडली.


विशेष आकर्षण म्हणुन नर्सरी ते के. जी. २ च्या विध्यार्थ्यांनी राधा व कृष्णाची वेशभुषा परिधान करून उपस्थित सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close