स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षा निमित्य रेणापूर येथे प्रभातफेरीच्या माध्यमातून जनजागृती

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
रेणापूर येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त दि.13 ऑगस्ट रोजी गावामध्ये प्रभातफेरी च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली यावेळी स्वातंत्र्या मध्ये ज्यांनी आपले बलिदान दिले असा महापुरुषांच्या अवतारामध्ये महापुरुष अवतरले या भूमी वेशभूषा मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची बैल गाडीला सजवून त्यामध्ये बसवून गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली यावेळी मा.दादासाहेब टेंगसे साहेब माजी सभापती जि.प.परभणी, जेष्ठ नेते लक्ष्मणराव टेंगसे आबा,संदीप भैया टेंगसे,सुरेश अप्पा टेंगसे,सतीश पाटील सरपंच चोखोबा उजगरे ग्रामसेवक संदिपान घुंबरे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक व सर्व शिक्षक,शिक्षिका,ज्ञानोपासक विद्यालय मुख्याध्यापक व सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी,आरोग्य कर्मचारी,आशा सेविका,सर्व जेष्ठ गावकरी नागरिक,युवक मित्रमंडळी उपस्थित होते.
पुढच्या वेळेस च्या 15 ऑगस्ट ला रेनापूरमधून 10 व 12 वीला प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यां च्या हस्ते होणार ध्वजारोहण
-मा.दादासाहेब टेंगसे
आजपासून पुढील तीन दिवस सर्व गावकऱ्यांनी घ्यावा सहभाग.
- ग्रामसेवक संदिपान घुंबरे