ताज्या घडामोडी

आनंद माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षिस वितरण

आनंदवनातील भारत जोडो कार्यालयात
कार्यक्रमाचे आयोजन

शैक्षणिक जीवनातील मार्ग विचारपूर्वक निवडा डॉ.भारती आमटे

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन येथील 2021-22 या सत्रात झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत गुणवत्ता प्राप्त
विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा 3 आगस्ट 2022 ला आनंदवनातील भारत जोडो कार्यालयात घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेविका डॉ.भारती आमटे ,ह्या होत्या त्यांनी याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून आपले विचार व्यक्त करतांना म्हणाल्या जे व्यक्ती अचूक मार्गदर्शन करतात,त्यांच्याशी चर्चा करून शैक्षणिक जीवनातील पुढील मार्ग विचारपूर्वक निवडा जी शाखा आवडते व तुम्हाला जमते तीच शाखा निवडा.जगाचे सर्व व्यवहार इंग्रजीतून आहे,मात्र गणित सुद्धा महत्वाचे आहे. दहावी -बारावी करियर मार्गदर्शन शाखा शाळेत सुरू करण्याची सूचना केली .त्यांनी आपले विचार व्यक्त केले. तर प्रमुख अतिथी म. से .स. चे विश्वस्त आदरणीय सुधाकर कडू, सदाशिवराव ताजने, नलगिंटवार सर,शिव सर,कडेकर सर,राजेश ताजने, सर,बक्षी सर व शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या गोखरे ह्या होत्या.
गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी पूनम बगडे,प्रियंका चौधरी,तेजस्विनी चौधरी,अंजली मडावी ,आर्या गजभे
या विद्यार्थिनींचा डॉ.भारती आमटे,सुधाकर कडू,सदाशिवराव ताजने यांचे हस्ते रोख पुरस्काराचे वितरण व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.आनंद माध्यमिक विद्यालयाचा 2021-22 या सत्राचा निकाल 100 टक्के लागला आहे हे विशेष त्यामुळे दरवर्षाला गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले जातात.महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन येथे वर्ग नववी व दहावी अशी दोन वर्ग असून 2018 ला 13 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या शाळेत आज 115 विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत आहे.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका स्मिता काळे ,प्रास्ताविक मुख्याध्यापिका विद्या गोखरे यांनी तर आभारप्रदर्शन शिक्षक आशिष येटे सरांनी केले. कार्यक्रमाला शाळेचे सहा.शिक्षक प्रदीप कोहपरे,मयुर गोवारदिपे,निशा येरणे मॅडम व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close