ताज्या घडामोडी

वन्य जंगली प्राण्यांनपासून होनाऱ्या शेतकाऱ्यांचे नुकसान थांबविण्याकरिता प्रहारने दिले निवेदन

मागण्या मान्य न झाल्यास प्रहार स्टाईलने करणार आन्दोलन

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी

शेतकरी, शेतमजूर पवनी तालुका,जिल्हा भंडारा च्या वतीने,वन्य जंगली प्राण्यांनपासून वन्य प्राणी हे शेतात घुसून शेतीची,धानाची मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत.त्यामुळे शेतकरी वर्गाला अडचण निर्माण झाली आहे.त्याकरिता होणारा प्राण्यांनपासून नुकसान थांबविण्यात यावे. व जंगलातील कोणताही प्राणी शेतकाऱ्यांच्या शेतात घुसून नुकसान करणार नाही.याकरिता जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा.
१) जंगलातील प्राण्यांना शेतात येऊ नये म्हूणन कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा.
२) मागील झालेल्या शेतातील पंचनामा करून नुकसान भारपाई त्वरित मिळण्यात यावी.
३) जंगल प्रभावित गावातील शेती संपादन करावी.किवा भाडे तत्त्वावर घेण्यात यावी.
४) पंचनाम्याचा प्रोसिजर करिता शेतकाऱ्यांला वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात.त्याकरिता साधी आणि सरळ प्रोसिजर पद्धत करण्यात यावी.
५) आळ जात आणि सागवण झाड कापणे व विक्री करणे हे शेतकाऱ्यांच्या अधिनिस्त राहिल.त्याला मंजूरी देण्यात यावी.
६) शेतकाऱ्यांच्या शेतीतिल पंचनामा करिता पिक नुकसान निशुल्क करण्यात यावा.
याकरिता निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना उपजिल्हा प्रमुख भंडारा दुधराम बावनकर,पवनी तालुका प्रमुख अक्षय तलमले,जिल्हा महासचिव सोनू दंडारे,जिल्हा सचिव दत्तू हटवार,पवनी शहर अध्यक्ष धनु सेलोकर,तालुका संघटक मोरु घुगुस्कर,अमोल देशमुख, युगल हटवार,शेतकरी बांधव दिलीप राउत,लहू देशमुख,प्रशांत मनापुरे, मोहन जांभुळकर,विनोद जांभुळकर,मोहन भालावि व आदि उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close