ताज्या घडामोडी

वरोरा तहसीलदारांच्या दडपशाही विरोधात पत्रकार एकवटले

तहसीलदार रोशन मकवाने यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी

उपविभागीय अधिकारी यांना ग्रामीण पत्रकार संघ, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे निवेदन.

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा-12 जानेवारी 2020 ला दैनिक नवजीवन चे प्रतिनिधी यांच्या घरावर तहसीलदार यांनी दडपशाही तंत्राचा संविधानिक पद्धतीने माफी मागा अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करू असा नोटीस लावण्यात आला होता. त्यामुळे पत्रकार क्षेत्रातून तहसीलदार रोशन मकवाने यांचा जाहीर निषेध करण्यात आला होता. त्याकरिता वरोरा पत्रकार संघाकडून उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना निवेदन देऊन तहसीलदार यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पत्रकार लोकशाहीचा सक्षम चौथा आधारस्तंभ असतो समाजातील चांगल्या वाईट घटना चा आपल्या जिवाची पर्वा न करता बातम्या शोधतो व समाजासमोर मांडतो. एक प्रकारे तो समाजाचा आरसा असतो तर याच बातम्यांमुळे काही पत्रकारांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला हे सुद्धा तितकेच सत्य आहे. वरोरा येथील तहसीलदार रोशन मकवाने सुद्धा दबावतंत्राचा वापर करूण पत्रकारांना धमकावण्याचा प्रकार करीत असल्याची घटना वरोरा येथे घडली. दैनिक नवजीवन वृत्तपत्राचे प्रतिनिधी ओम चावरे यांना तुम्ही माफी मागा अन्यथा तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू असा नोटीसच त्यांच्या घरावर लावण्याचा प्रकार तहसीलदार रोशन मकवाने यांनी केला होता. त्यामुळे आज वरोरा येथील स्व.पी.एल. शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ यांच्याकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन त्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून तहसीलदार रोशन मकवाने यांचेवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वरोरा तहसील कार्यालयाला लाभलेले तहसीलदार रोशन मकवाने आपल्या प्रशासकीय कामापेक्षा अवैध गौण खनिज माफिया यांच्यावर मेहेरबान असल्याने जास्त प्रसिद्ध आहे. असा खुलासा गेल्या काही दिवसापासून दैनिक नवजीवन या वृत्तपत्राने केला होता .नुकताच दिनांक आठ जानेवारीला रात्री एक वाजेच्या दरम्यान तलाठी शरद दाते, दिलीप शेळकी व तहसीलदार यांचा गाडी चालकाने खांबाडा गावाजवळ काळ्या रेतीने भरलेला बिगर नंबरचा ट्रॅक्टर पकडला. मोक्यावर ची सेटिंग फीस्कटल्याने तो बिगर नंबर चा ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला.मात्र त्या ट्रॅक्टर वर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता तहसीलदार रोशन मकवाने यांनी 80 हजार रुपये घेऊन सोडल्याची चर्चा तहसील कार्यालयात जोरदार सुरू होती. त्या संदर्भात तलाठी शरद दाते यांना विचारणा केली असता त्यांनी ट्रॅक्टर पकडल्याच्या माहिती ला दुजोरा दिला होता. त्यांच्या सांगण्यावरून बातमी प्रकाशित केली असता तहसीलदार रोशन मकवाने यांनी दैनिक नवजीवन चे प्रतिनिधी यांच्या घरावर तुम्ही दिलेल्या बातमी संदर्भात माफी मागा नाही तर तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा चक्क नोटीसच लावण्यात आला आहे. ही एक प्रकारची दडपशाही आहे. जर तहसीलदार यांना आपले मत मांडायचे होते तर ते त्यांनी प्रसार माध्यमातून मांडायला पाहिजे होते परंतु तसे न करता त्यांनी पत्रकारांना फौजदारी गुन्हे दाखल करून अशी दमदाटी देऊन संविधानिक हक्क हिरावून घेण्याचे कार्य केले आहे. अशा बेबंदशाही वृत्तीला आळा बसायला पाहिजे याकरिता पत्रकार संघाकडून निवेदन देण्यात आले. उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना निवेदन देते वेळेस बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आशिष घुमे, स्वर्गीय पी एल सिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अशपाक शेख, सचिव सुनील शिरसाठ तसेच पत्रकार अनिल पाटील, प्रदीप कोहपरे, हितेश राजनहिरे, डॉक्टर मनोज तेलंग, मनोज गाठले, अतुल निब्रड, सुरज घुमे, ओम चावरे उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close