ताज्या घडामोडी

आनंदवनातील दिव्यांग विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा तालुका विधी सेवा समिती वरोरा व संधी निकेतन अपंगांची कर्मशाळा आनंदवन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शक न्यायाधीश जमाऐवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले . विद्यार्थ्यांना तुम्ही केव्हाही न्यायालयात या, न्यायालय तुमच्याकरता सदैव तत्पर असेल असे सांगितले . एडवोकेट भावना लोया यांनीही मार्गदर्शन केले. नेहमी खरे बोला व प्रयत्नांची साथ सोडू नका असे भाष्य त्यांनी केले .उपप्राचार्य राधा सवाने यांनी आपल्या भाषणातून सांगितले की समाजातील प्रत्येक घटकाकरिता कायद्याची तरतूद आहे या कायद्याची जाण आपल्याला असेल तर आपले जीवन सुकर होऊ शकते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संधी निकेतन चे अधीक्षक रवी नलगंतीवर सर यांनी केले. संधी निकेतन मध्ये चार विविध प्रकारचे दिव्यांग विद्यार्थी प्रशिक्षण घेतात त्यांना प्रशिक्षित करताना विशेष मेहनत घ्यावी लागते. दिव्यांग विद्यार्थ्यांकरता युट्युब चॅनेल वरील कायदेविषयक आणि संविधानाविषयी माहिती देणाऱ्या कार्यक्रमाविषयी त्यांनी सर्वांना अवगत केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीपक शिव सर यांनी केले.काही उदाहरणांद्वारे त्यांनी नमूद केले की दिव्यांग विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान असणे किती आवश्यक आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक अश्विनी मॅडम यांनी केले तर प्रवीण ताठे सर यांनी विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषेत मान्यवरांनी दिलेले मार्गदर्शन समजावून दिले. कार्यक्रमासाठी सीमा लाहोटी मुख्याध्यापक भसारकर सर बोपचे सर,इक्रम पटेल सर, इतर शिक्षक व सहकारी उपस्थित होते. संधी निकेतन अपंगांची कर्मशाळा यातील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने कार्यक्रम यशस्वी झाला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close