आदिवासी समाजाचे हित जोपासणारे केंद्र सरकार…खासदार अशोक जी नेते
भव्य आदिवासी समाज मेळावा माता अनुसया सेलिब्रेशन हॉल नालवाडी वर्धा येथे संपन्न.
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
आदिवासी समाजाचे कुंवार भिमसैन व हनुमान जयंती या निमित्तयाचे औचित्य साधुन भव्य आदिवासी समाज मेळावा आज दि.२३ एप्रिल २०२४ रोज मंगळवार ला माता अनुसया सेलिब्रेशन हॉल नालवाडी वर्धा जि. वर्धा येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार अशोकजी नेते यांचे शुभहस्ते आदिवासी समाज दैवतांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करून सुरूवात करण्यात आले.
या आदिवासी समाज मेळाव्याच्या कार्यक्रमाला उद्घाटनप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी संबोधित करतांना म्हणाले आदिवासी समाज एकसंघाने एकत्रित येऊन सामाजिक लढा दिला पाहिजे. आदिवासी समाजाचे हित जोपासत समाजाच्या विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध असून हया समाजाच्या विकासासाठी शासन स्तरावर अनेक योजना कार्यान्वित करून अंमलात आणले आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन आपल्या स्तरावर प्रयत्नशील कार्य करित आहे.देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी आपल्या आदिवासी समाजाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी म्हणून द्रोपदी जी मुर्मू यांना विराजमान केल्या यात मौलाचा व सिंहाचा वाटा आहे.खऱ्या अर्थाने आपल्या आदिवासी समाजाला मिळालेला हा बहुमान आहे.आदिवासी समाजासाठी शासन राबवित असलेल्या केंद्र शासनाची माहीती देत केंद्र सरकार सुद्धा समाजाच्या हितासाठी व विकासासाठी कटिबद्ध आहे.असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
यावेळी मंचावर प्रामुख्याने या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते,प्रदेश महामंत्री आदिवासी मोर्चाचे नितिनजी मडावी,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, शंकर भाऊ आत्राम,नीताताई गजाम,सरस्वती ताई मडावी, भारत भाऊ कोवे, नलिनी सयाम, राजु भाऊ मडावी, अक्षय उईके, प्रल्हादजी पोयाम, शारदाताई तुमडाम, पद्माताई कोडापे, अर्चनाताई उईके, विठ्ठलराव घडीनकर, किसनभाऊ वाघमारे ताराचंद भाऊ दुर्वे, तसेच मोठ्या संख्येने आदिवासी समाज बंधू भगिनीं बांधव उपस्थित होते.