राजीनाम्याची दुसरी बाजू: आंतरराष्ट्रीय मीडियामुळे झुकले मोदी सरकार

उपसंपादक:विशाल इन्दोरकर
प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे
Gen Z च्या जंतर मंतर वरील आंदोलनामुळे शेवटी अहंकारी मोदी सरकार नमले आणि धर्मेंद्र प्रधान यांची शिक्षण मंत्री म्हणून हकालपट्टी करण्यात आली. हे आज अतिशय सुखद वाटत असले तरी हे सरकार खरचं या तरुणाई समोर नमेल का हा मोठा यक्षप्रश्न होता.
आंदोलनकारी तरुण हे आतंकवादी, पाकिस्तान चे हस्तक, चीन चे एजंट, देशद्रोही आहेत हे मोदी चे सर्वच मंत्री, BJP चे कार्यकर्ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत ओरडून सांगत होते. गोदी मीडिया वाल्यांनी तर सिद्धही करून दाखविले होते. मग अचानक असे काय घडले की रात्री 12 वाजता मोदींची झोप उडाली व व्हिडीओ बनवून पाठवावा लागला.
भारतातील या सर्व घडामोडीची दखल आंतरराष्ट्रीय मीडिया घेत होता. निहत्या तरुण-तरुणींवर झालेला अमानुष लाठीचार्ज, नावाची बॅच नसलेले पोलीस, गणवेशात नसलेले संशयित पोलीस, लाठीला खोचलेले तीक्ष्ण खिळे हे सर्व या जागतिक मीडियाने जगाला दाखविले. यामुळे परदेशात असलेल्या भारतीयांची मोदींभक्तीची नशा उतरली, त्यांना मोदींचा खरा चेहरा स्पष्ट दिसू लागला. परदेशी भारतीयांनी ते राहत असलेल्या देशात आंदोलन चालू केले.
आता ही जागतिक बातमी बनली, मोदींचा खरा चेहरा जगासमोर आला. जर्मनी, व इतर युरोपियन देशांनी या बातमीचे सज्ञान घेतले आणि ही चर्चा त्यांच्या संसदेत पोहचली. जर्मनीतील खासदार हेनरी स्मिथ यांनी जाहीर केले की ‘जर्मनी व युरोपिअन देश भारताच्या घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवून आहेत आणि ते आपल्या आंदोलनकारी तरुणांसोबत कशी वागणूक करणार यावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत’.
भारतात मोदींविरुद्ध राजकीय अस्थिरता पसरत आहे हे जगाला समजून आले. यामुळे देशाची पूर्ण नाचक्की झाली व परकीय गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम तयार झाला. आधीच खिळखिळीत झालेल्या आपल्या अर्थव्यवस्थेवर जागतिक नाचक्की मुळे मोठे संकट ओढावू शकते हे मोदींना वेळीच लक्षात आले. ज्या देशांनी मोदींना पुरस्कार दिले होते त्या देशातील विरोधकांनी तेथील सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले.
या सर्व कारणांमुळे मोदींचा जगासमोर दाखविलेला ‘विश्वगुरू’ चा मेकअप उतरला आणि तश्याच उतरलेल्या अवतारात रात्री 12 वाजता व्हिडीओ बनवून Gen Z ला पाठविला.
आजच्या धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यात आंतरराष्ट्रीय मीडियाचा व परदेशी भारतीयांचा, त्यांनी उचलून धरलेल्या मुद्द्यांमुळे सिंहाचा वाटा आहे. Gen Z, परदेशी भारतीय व आंतरराष्ट्रीय मीडिया ला पुन्हा एका तानाशाहाला नमविल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.









