तुरा येथे माजी उपमुख्यमंत्री स्व अजित दादा पवार यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

तुरा येथे माजी उपमुख्यमंत्री स्व अजित दादा पवार यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते धनंजय आडसकर यांचा पुढाकार
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व अजित दादा पवार यांची जयंती तुरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते धनंजय आडसकर यांच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

तालुक्यातील तुरा येथे स्व अजित दादा पवार यांची जयंती सकाळी ८ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली.
त्यानंतर गावामध्ये विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी तसेच मोतीबिंदू तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी ५६० नागरीकांची तपासणी करण्यात आली यामध्ये ४५ रुग्णांची मुंबई येथील शंकरा आय हॉस्पिटल मध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

या वेळी पोलिस पाटील विष्णू मोरे, माजी सरपंच हरिभाऊ जाधव, माजी उपसरपंच भागवत ढाणे, रामेश्वर चाळक, डॉ भाले मॅडम, डॉ जाधव , बन्सीधर चाळक, नंदकुमार चाळक रामेश्वर ढाणे, आदी उपस्थित होते.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी समिर सय्यद, सुरेश आडसकर, बालासाहेब चाळक, प्रल्हाद जाधव, सोहेल सय्यद, नागसेन मनेरे आदींनी परिश्रम घेतले.









