ताज्या घडामोडी

रेणापूरमध्ये SIR-2026 मोहिमेला वेग; मतदार पडताळणीचे काम युद्धपातळीवर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

रेणापूर, दि. १६ जुलै २०२६ :
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६ अभियानांतर्गत रेणापूर येथे मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व पर्यवेक्षक (Supervisors) यांच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराची माहिती पडताळून गणना पत्रे (Enumeration Forms – EF) संकलित केली जात आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गावातील सर्व पात्र मतदारांची १०० टक्के गणना पत्रे संकलित करून नोंदणी करणे हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानुसार रेणापूरमध्ये घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती अचूकपणे अद्ययावत करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

याच अभियानाचा एक भाग म्हणून आज रेणापूर येथे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मा. दादासाहेब टेंगसे यांच्या गणना पत्राची (EF) पडताळणी करण्यात आली. यावेळी स्थानिक BLO व पर्यवेक्षकांनी प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक माहितीची खातरजमा केली व SIR-2026 अंतर्गत प्रक्रिया पूर्ण केली.

यावेळी मा. दादासाहेब टेंगसे यांनी रेणापूर गावातील सर्व मतदारांना आवाहन करताना सांगितले की, “मतदार यादी अचूक व अद्ययावत राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे. ही प्रक्रिया लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.”

दरम्यान, दादासाहेब काका टेंगसे यांनी रेणापूर गावातील सर्व मतदारांना SIR-2026 मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन BLO यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close