सावरी (बिड)प्रथमिक आरोग्य केंद्र नव्या सुसज्ज इमारतीत हलवुन उद्घाटन करा

प्रहार सेवक यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या कडे साकडे अन्यथा गावातील जेष्ठ नागरिक याच्या हस्ते आरोग्य केंद्राचे उद्घाटन करु
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
सावरी प्राथमिक आरोग्य केंद्रची ईमारत दोन वर्षा पासुन बांधकाम पूर्ण होऊन येथिल कारभार जीर्ण इमारतीत
चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ४२ गावाचा समावेश आहे येथिल आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली आहे तसेच या इमारतीत प्रशस्त जागा नाही पुरेशा खोला सुध्दा नाही त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नविन इमारत मंजुर करण्यात आली.नविन ईमारतीचे बांधकाम दोन वर्ष पूर्ण झाले आहे आता नविन सुसज्ज अशा इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्र हलविण्यात यावे जेणेकरून या परिसरातील ४२ गावातील रुग्णांना आरोग्य सुविधा मिळतील अशी आशा नागरिकांना होती मात्र दोन वर्ष लोटूनही आरोग्य केंद्र नविन इमारतीत स्थलांतरित करण्यात आलेले नाही त्यामुळे नागरिकांच्या आशेवर पाणी फेरले आहे तरी या नविन सुसज्ज इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे तरी सावरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारतीचे लवकरात लवकर उद्घाटन करुन तेथील कारभार नविन सुसज्ज ईमारत हलवाण्यात अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सचिन घानोडे मुरलीधर रामटेके लोकेश खामनकर नारायण मत्ते यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष सध्याताई गुरुनुले यांच्या कडे निवेदनातून केली अन्यथा गावातील जेष्ठ नागरिक याच्या हस्ते उद्घाटन करू असा इशारा दिल्या निवेदनातून करण्यात आला