ताज्या घडामोडी

चंद्रपूरातील माता महाकाली यात्रेला आरंभ

दर्शनार्थ भाविकांची मंदिरात अलोट गर्दी !

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या विदर्भात प्रख्यात असलेल्या चंद्रपूर शहरातील माता महाकाली यात्रेला आज सोमवार दि.२७मार्चपासून सुरुवात झाली.यात्रेच्या पहिल्याच दिवशी मंदिरात दर्शनार्थ भक्तगणांची सकाळ पासूनच अलोट गर्दी लोटली होती.दरम्यान चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या माता महाकाली च्या दर्शनार्थ व यात्रेसाठी विदर्भासह मराठवाडा व तेलंगणातील भाविक मोठ्या संख्येंने चंद्रपूरात दाखल झाले असल्याचे आज दिसून आले.रविवार पासून मिळेल त्या साधनाने भाविक चंद्रपूर शहरात येत आहे.आज माता महाकालीची विधिवत पुजा अर्चना झाल्या नंतर शेकडों भाविकांनी रांगेत राहुन मातेचे दर्शन घेतले.महाकाली देवस्थान कमिटीसह प्रशासनाने भक्त गणासाठी उत्तम व्यवस्था केली आहे. या वर्षी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक राहणार असल्याचा एक अंदाज आहे.भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर परिसरात स्थानिक प्रशासनाने ,पोलिस विभागाने तसेच माता महाकाली देवस्थान कमिटीने संपूर्ण तयारी केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close