ताज्या घडामोडी

बौद्ध धम्मातील दान पारमितेचा आदर्श साकार करत ब्रह्मपुरीतील चहांदे कुटुंबाने केले अवयव दान

ब्रह्मपुरी (जिल्हा चंद्रपूर) : बौद्ध धम्मातील दान पारमिता या सर्वोच्च मूल्याला अनुसरून वाल्मीक नगर, ब्रह्मपुरी येथील चहांदे कुटुंबाने गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त एक अभूतपूर्व निर्णय घेतला आहे.

जयंत वामन चहांदे, त्यांच्या पत्नी माया जयंत चहांदे आणि मुलगा मयूर जयंत चहांदे यांनी एकत्रितपणे अवयवदान करण्याची संमती नोंदवली आहे. बौद्ध धम्मातील दान, करुणा आणि परोपकार यांच्या प्रेरणेने घेतलेल्या या निर्णयाने परिसरात चर्चा निर्माण झाली आहे.

मयूर जयंत चहांदे (तरुण पिढी) म्हणाले, भारतीय संविधानात अंतर्भूत असलेले कलम ५१-अ (h)
“प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असेल की, तो वैज्ञानिक दृष्टीकोन, मानवतावाद आणि चौकशी व सुधारणेची भावना विकसित करेल.”
तसेच बुद्धांनी दिल्या वैज्ञानिक धम्माला अनुसरून आम्ही सह कुटुंब अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

जयंत चहांदे म्हणाले,
“इतर कोणत्याही धार्मिक कर्मकांडात न पडता,आपले अवयव इतरांच जीवन वाचऊ शकले तर हा एक मोठा योगदान ठरेल.”

माया जयंत चहांदे यांनी सांगितले,
“एका व्यक्तीच्या शरीरातील अवयव दुसऱ्या व्यक्तीला नवजीवन देऊ शकतात, ही कल्पना खूप पवित्र आणि प्रेरणादायी आहे. आम्ही बौद्ध धम्मातील शिकवणुकीनुसार हे कर्तव्य पार पाडत आहोत.”

ब्रह्मपुरी येथील या कुटुंबाने अवयवदानाची नोंदणी पूर्ण केली असून, त्यांनी इतर नागरिकांना देखील बौद्ध धम्मातील दान पारमितेच्या प्रेरणेने अवयवदान करण्याचे आवाहन केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close