ताज्या घडामोडी
नागभीड रोड सायघाटा ला पुन्हा टिप्पर पलटी

तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभुर्णे
ब्रम्हपुरी ते नागभीड रोड मध्ये सायघाटा जंगल येथून जाणाऱ्या रोड वर काही दिवसापासून KCC कंपनी चे काम सुरु आहे. त्यामुळे त्यांनी काही diversion रस्ता बनवून दिलेला आहे. परंतु त्या diversion रोड ने जात असताना नेहमी ट्रक किंवा बुलडोझर रस्त्याच्या कडेला घसरून पडताना दिसत आहे. असेच काल रस्त्याने जात असताना टिप्पर पटली खाल्लेली दिसली. यापूर्वी सुद्धा बस त्याच ठिकाणी पालटलेली होती. अशे प्रकार वारंवार घडत आहेत. नागरिकांची विनंती आहे कि याकडे प्रशासनाने लवकर लक्ष देणे आवश्यक आहे. लवकर रोड तपासून त्यावर तोडगा काढावा अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे.









