के.के.एम महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

क
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
के.के. एम महाविद्यालयात दि. 2/04/2026 रोजी राज्यशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी व स्पर्धात्मक युगात ते टिकून राहावेत या उद्देशाने सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत एकूण 120 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यापैकी गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक
सागर संतोष पांढरे
शहाणे अशोक दीपक
द्वितीय क्रमांक
धर्माधिकारी वैष्णवी आदेश
तृतीय क्रमांक
प्रशांत विष्णू उकलकर
उत्तेजनार्थ बक्षीस
रखमेश शिंदे
या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक श्री.दिलीपजी हिबारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे, प्राचार्य डॉ.नागनाथ कदम तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पंडित मोरे यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने राज्यशास्त्र विभागाच्या वतीने अशा विविध स्पर्धांचे आयोजन नियमितपणे करण्यात येते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे, उपप्राचार्य के.जी.हुगे,पर्यवेक्षक प्रा. अनिल कापसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमाबद्दल संस्थाचालक व प्राचार्यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले.









