प्रहार संघटनेच्या आंदोलनास मिळाले यश

लेखी आश्वासनानंतर आंदोलन पूर्ण
ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी
प्रहार जनशक्ती संघटनेने विविध समस्या घेऊन ग्रामपंचायत नेरी समोर आंदोलन केले हे आंदोलन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अपंगांना न्याय व स्थानिक समस्यांचा निपटारा करण्यासाठी करण्यात आले. प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीने उपविभागीय अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दिनांक 3 सप्टेंबर २०२१ ला दिलेल्या निवेदनात नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे सर्वात मोठे असून या केंद्राला सहा उपकेंद्र जोडलेली आहेत परंतु हे प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक समस्यांच्या विळख्यात अडकलेली आहे. तिथे तज्ञ वैद्यकीय अधिकारी नसून रात्रीला डॉक्टरच उपलब्ध राहत नसल्यामुळे येणाऱ्या रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो .तेथे येत्या दहा दिवसात एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करून द्यावे न दिल्यास प्रहार संघटनेकडून थेट खुर्ची जप्ती आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला .परंतु झोपेचे सोंग घेऊन असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी दिनांक १६ सप्टेंबर २०२१ आंदोलकांची तारीख घेऊन उपविभागीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन चिमूर यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाचा धसका घेऊन दुसऱ्याच दिवशी दोन एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी नियुक्त करून प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे रुजू करून दिले. प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे अनेक समस्यांना घेऊन दिनांक १६ सप्टेंबर २०२१ ला ग्रामपंचायत निधी येथे आंदोलन चालू असताना उपस्थित पोलीस निरीक्षक गभने यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजू गायकवाड यांच्या मध्यस्थीने प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथील नवीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल डांगरे तसेच डॉक्टर सतीश वाघे यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या व उर्वरित समस्या वरिष्ठांकडे सादर करून पाठपुरावा करून पूर्ण करणार असे आश्वासन दिले. नव्याने रुजू झालेले डॉक्टर निखिल डांगरे यांचा प्रहार जनशक्ती पक्ष तथा प्रहार वाहक चालक संघटनेच्या वतीने पुष्पहाराने आंदोलन स्थळी सत्कार करण्यात आला त्यानंतर आंदोलन पूर्ण झाले.









