जर्मनीच्या श्री रॉल्फ यांच्या हस्ते तिसऱ्या उन्हाळी योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन महाविद्यालयामध्ये तिसऱ्या उन्हाळी योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि.18/04/2022 ते 10/05/2022 पर्यंत करण्यात आले आहे.या शिबिराचा उद्घाटन समारंभ दि.20/04/2022 ला जर्मनीचे श्री रॉल्फ यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी मंचावर उपस्थित अध्यक्ष म्हणून महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, तसचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.पोळ, आनंदवनाचे विश्वस्त सुधाकर कडू , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे, उपप्राचार्या सौ. राधा सावणे उपस्थित होते.श्री रॉल्फ यांनी खेळाचे महत्व पटवून दिले.तसेच सर्व पाहुण्यांनी सुद्धा सर्व शिबिरार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या उन्हाळी योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये ऐकून 25 खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामध्ये मल्लखांब, रोप मल्लखांब,अॅथलेटिक्स,कबड्डी, खो खो, सेपक टकरॉ, हँडबॉल,बेसबॉल,नेटबॉल,बॅडमिंटन,बॉल बॅडमिंटन, लॉन टेनिस,फुटबॉल, क्रिकेट,बॉक्सिंग,कुस्ती,बास्केटबॉल, टेबल टेनिस,क्रिकेट,व्हॉलीबॉल, योगा , तायक्वांदो, पॉवरलिफ्टिंग,धनुर्विद्या तसेच भारतीय पारंपरिक खेळांचे सुद्धा प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामध्ये लाठी काठी,घुंगरू काठी, दंडबैठक, जोडी कवायत, दंबल ,लेझीम यांचा समावेश आहे.या शिबिरामध्ये ऐकून 650 शिबिरार्थी सहभागी झाले आहे. त्यांना ऐकून 50 राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहे.
उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक शिबिराचे शिबिर प्रमुख प्रा. तानाजी बायस्कर यांनी केले.त्यांनी या शिबिरामागील उद्देश पटवून दिले.तसेच संचालन प्रा.सौ प्रियांका भुकिया यांनी केले.