ताज्या घडामोडी
केंद्रीय कन्या शाळेत विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
बोरी येथील केंद्रीय कन्या शाळा मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध प्रयोगाचे प्रदर्शन भरवण्यात आले या प्रदर्शनामध्ये शाळेतील 60 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विविध प्रकारचे प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले व उत्कृष्ट प्रकारे माहिती दिली या प्रदर्शनास केंद्रप्रमुख पांडे सर, प्रमुख पाहुणे म्हणून मारोती गायकवाड, प्रवीण लाखकर, गोविंद लाखकर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी केलेले प्रयोग याची पाहणी करून प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांचे नंबर काढण्यात आले या प्रदर्शनामध्ये शाळेचे मुख्याध्यापक राऊत सर, गभणे मॅडम, डोके मॅडम ,माटे सर व शाळेतील शिक्षक शिक्षिका व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले हे प्रदर्शन पाण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी खूप मोठ्या प्रमाणावर उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.