राष्ट्र सेवा दल आयोजित निबंध स्पर्धेतील गुणवंत विदयार्थ्यांना बक्षीस वितरण

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
राष्ट्र सेवा दल चिमूरतर्फे महाराष्ट्र माऊली साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने निबंध स्पर्धा घेण्यात आली.या निबंध स्पर्धेत विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.चिमूर येथील न्यू राष्ट्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यालयातील आदित्य किरणकुमार मेश्राम आणि जिया जयदेव रेवतकर या दोन विद्यार्थ्यांनी प्रोत्साहनपर पारितोषिक पटकावले.
बक्षीस वितरण समारंभ न्यू राष्ट्रीय विद्यालय येथे मुख्याध्यापक सुनील खोब्रागडे यांचे अध्यक्षतेत संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्र सेवा दल मंडळ सदस्य सुरेश डांगे,चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष रावन शेरकुरे, कोषाध्यक्ष रामदास कामडी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, श्यामची आई पुस्तक तथा रोख रक्कम प्रदान करण्यात आली.सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.शाळेला श्यामची आई पुस्तक भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन तथा आभारप्रदर्शन आशिष वरखेडे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.