सामाजिक राजकीय जीवन जगताना सामाजिक एकोपा जपला पाहिजे – डॉ.जितीन वंजारे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आपल्या बोलण्याने आपल्या वागण्याने समाजात काय फरक पडेल हे ओळखून सामाजिक, राजकीय आणी सेलिब्रेटी लोकांनी वागले पाहिजे .आजकाल काही नेते बेताल वक्तव्य उघडपणे बोलत आहेत त्यामुळे सामाजिक एकोपा विकोपाला जाऊन समाजात मोठी दरी निर्माण होऊ शकते. दंगल पेटू शकते याची जान नसणारे काही स्वार्थी नेते समाजात आहेत त्यांना गव्हातील खड्याप्रमाणे बाजूला सारा.आणी सामाजिक एकोपा राहील,स्वातंत्र्य ,एकता ,बंधुता जपून राहील असं वागले पाहिजे असे विचार सामाजिक कार्यकर्ते आणी वंचित घटकांचे नेते मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.
काल ईद झाली नेहमी प्रमाणे मित्रांचे फोन आले कुठे गेलो कुठे जाता आल नाही. ईद ला स्नेहभोजनासाठी आवर्जून बोलावणारा मनात कसलाही आकस न ठेवता हिंदू मुस्लिम एकता दाखवणारा ईद- उल- फित्र हा सन किंवा हिंदूचा दिवाळी हा सन एकता मानवता बंधुता दर्शवतो.ही भारतातील विविधतेत एकता आहे महामानव बोधीसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची प्रत्येक समाजाला, जातीला, धर्माला बांधून ठेवणारा हा दुवा आहे.तो आपण गेल्या अनेक शतका पासून जपत आलो आहोत मग काही फूसके सुपारी नेते स्वतःला हिंदू चे नायक समजून हा सामाजिक सलोखा बिघडु पाहत असतील तरी त्यांना जाग्यावर प्रतिबंध घातला पाहिजे कोणाची सुपारी घेऊन आजपर्यंत सहन झालेली आजान आज कानाला जमत नसेल तर त्या नेत्याने अगोदर च्या सरकार ला विचारावं तुमचा पण काळ होता तुम्ही तेव्हा आजान बंद का नाही केली ? भोंगे का उतरवले नाही ? म्हणजे उघड आहे राज्यात आणी देशात धार्मिक वाद घालून दंगल घडवून माथी भडकाउन बहुजन मुलांना नौकरी पासून दूर ठेवायच,त्यांना केसेस मध्ये अडकऊन जीवन बरबाद करून आपला कायमचा फुकटचा कार्यकर्ता बनवायचा आणी कायम झेंडा घेऊन सतरंज्या उचलायला लावायच्या आणी यांच् शेम्बड पोरग डायरेक्ट स्टेज वर बसवून मंत्री करायच हीच आजकाल च्या स्वतःला हिंदूचा महामेरू समजणाऱ्या नेत्यांना वाटते आहे .हे हणून पाडा.आजपासून निश्चय करा आपला नेता आपल्या सामाजिक राजकीय धार्मिक गरजा पुरवतो का ? त्याला आपल्या संसाराची काळजी आहे का ? तो आपल्याला तितकी किंमत देतो का ? हे सगळं पाहुण आपण त्याच्या मागे राहायच का नाही ते ठरवलं पाहिजे .नुसतं माथी भडकाऊन माथी फोडायला लावून जेल मध्ये पाठवनाऱ्या ऐऱ्या गैऱ्या नेत्याला आता त्याची जागा दाखवा असे परखड मत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.
समाजाची भीम जयंती असो किंवा शिवजयंती असो ,जाती नुसार त्या त्या घटकातील महान कार्य करणाऱ्या साधू ,संत ,महापुरुष यांच्या जयंती ,पुण्यस्मरण,सन ,उत्सव आपण एकमेकांचे आहेत असे समजून आनंदाने साजरे केले पाहिजेत त्यात जातं धर्म म्हणून न पाहता मानवता हीच शिकवण घेऊन साजरी केली पाहिजेत.काल झालेल्या मुस्लिम समाजाच्या ईद या मोठ्या सणाला मुस्लिम बांधव आवर्जून माणुसकी ने घरी बोलावतात स्नेहभोजन देतात हे का करतात ? यामागे आपली एकता आणी बंधुता दिसून येते यात माणुसकी दिसून येते म्हणून.आणी हेच समाजातील वेगळंपण सगळ्यांनी समजून घेऊन सर्वांच्या धार्मिक भावना जपून एकीने वागलो पाहिजेत. नसता जगात हाहाकार माजून रशिया युक्रेन वाद जसा पेटला तस जग एकदाच बॉम्ब च्या अगीने खाक होईल यात शंका नाही.काल मी माझ्या जिवलग मित्र कौसर शेख याच्या घरी गेलो सालाबादप्रमाणे न चुकता मला त्याचा दरवर्षी फोन येतो तसा याही वर्षी फोन आला “दादा शिरखुर्मा आणी गुलगुले खायला घरी ये” हे प्रेम बंधुता एखाद्या पुळचट नेत्यामुळे जर संपून जाणार असेल तर आपण जोरदार प्रतिकार केला पाहिजे, यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी आपण दुश्मनी का करायची ? त्या नेत्याला खेड्यात ये म्हणावं आजही गोरगरीब जनता आजान वर सकाळी पाच ला झोपेतून उठतो ,दिवसाची सुरुवात करतो दुपारच्या आजान ला कामावरून जेवणासाठी उठतो आणी सायंकाळीच्या आजान ला कामावरून सुटतो आणी घरी येतो हे आम्हाला जन्मापासून न त्रास होता सहन होत मग सुपारी नेत्यांना का नाही होत ? बर आत्ताच का आतापर्यंत बर वाटल मग आत्ताच का नाही? ध्वनीप्रदूषण चा विषय असेल तर करा ना सगळंच बंद काकड आरत्या ,लग्नातील डीजे ,वरात ,जत्रा ,डीजे वर बाया नाचऊन साजरे होणारे सन,नवरात्री ,गणपती ,कीर्तन ,पसायदान ,बारा वाजेपर्यंतचा हारी पाठ हे सगळंच करा बंद आणी मुख्य म्हणजे पुळचट नेत्याच्या जंगी स्वागतासाठी लावलेला बँडबाज्या,डीजे ,निवडणूकित लावलेल्या प्रचारासाठी ची यंत्रणा,निवडनुकप्रचार सभा ,सुपारी सभा, निवडून आल्यावर च्या डीजे च्या मोठ्या आवाजातील मिरवणूका हे दिसत नाही काय ? हे सगळं बंद करा ज्याला आजानचाच भोंगा दिसतो त्यांनी भोंगा लावून हे ऐकावं मी मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर छातीठोकपणे सांगतो काही जणांनी सुपारी घेऊन या देशाचा आणी महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा बिघडवायचा आहे तो एक भारतीय सुजाण नागरिक म्हणून मी कदापीही होऊ देणार नाही.जयभिम ,जयहिंद ,जय भारत जय संविधान – लेखन सामाजिक कार्यकर्ते मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर-9922541030