मूल नगरीत अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
मूल नगरीत अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले असून काही प्रभागातील अवस्था अतिशय दयनीय असल्याचे माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनाने एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. दरम्यान शहरातील अतिवृष्टीमुळे बाधित मूल शहरातील वॉर्ड क्रमांक 14 मधील युवाशक्ती व्यायाम शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिकांच्या घरी जाऊन काही पदाधिका-यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथील परिस्थिती फारच दयनीय असल्याचे त्यांना दिसून आले.
अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले असून मोठ्या प्रमाणावर दैनंदिन जीवनोपयोगी साहित्यांचे नुकसान झालेले आहे.
एव्हढेच नाही तर घरांत पाणी शिरल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
सबंधित बाधित कुटुंबातील नागरिकांना शासकीय मदत पुरविण्यात यावी व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अश्या आशयाचे एक निवेदन मूलच्या तहसिलदार मोरे यांना देण्यात आले.
यावेळी डॉ.आनंदराव कुळे , प्रवीण भरतकर संजय चिटमलवार ,श्रीकांत आंबटकर ,राजू रामटेके ओमदेव मोहुर्ले ,धर्मेंद्रजी सुत्रपवार ,कोरडे,जयंत मोरांडे आदिं उपस्थित होते.