दिव्य क्लिनिकचे थाटात उद्घाटन!

तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर
दिव्य क्लिनिकचे उद्घाटन माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे यांच्या हस्ते आज करण्यात आले.या प्रसंगी दिव्य क्लिनिक च्या संचालिका डॉ.सौ.मिनाक्षी डोंगरे,वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक श्री.अरविंद भाऊ सांदेकर,चंद्रपूर जिल्हा सचिव श्री. स्नेहदीप खोब्रागडे,ओबीसी नेते लक्ष्मण बागडे नागपूर,आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर दिव्य क्लिनिक च्या संचालिका डॉ. सौ मिनाक्षी डोंगरे यांनी अरविंद भाऊ सांदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून आनंद साजरा केला.
डॉ.रमेशकुमार गजभे,श्री.अरविंद भाऊ सांदेकर तसेच स्नेहदीप खोब्रागडे यांनी दिव्य क्लिनिक हे गोरगरीब जनतेला आपलंसं वाटावं व कमीत कमी पैशात चांगली रुग्णसेवा आपल्या माध्यमातून घडावी अशी मंगलकामना व्यक्त केली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दिव्य क्लिनिक च्या संचालिका डॉ. सौ.मिनाक्षी डोंगरे यांनी सर्व मान्यवर मंडळींचे आभार मानले व तुम्ही दिलेल्या शुभेच्छाना मी माझ्यावतीने न्याय देईल अशी ग्वाही दिली.दिव्य क्लिनिक चिमूर नगर पंचायत अंतर्गत कान्पा मार्ग वडाळा (पैकू) येथे आहे.