वंचित बहुजन आघाडी पाथरी च्या वतीने भव्य आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
वंचित बहुजन आघाडी चे
वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात यावी
शामराव ढवळे
राष्ट्रीय नेते एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालयावर मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यासाठी आंदोलनाचे आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार

आज दि 22/11/201 रोजी पाथरीच्या वतीने निवेदन देण्यात आले यामध्ये प्रमुख मागणी वंचित बहुजन आघाडी ने महाराष्ट्र सरकारला दिलेले “मोहम्मद पैगंबर” बिल येणार्या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात यावे,
5 टक्के मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाची तरतूद लागू करण्यात यावी महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या हूजर,त्यांना मासिक पगार सुरू करण्यात यावा
संत विचाराचा प्रसार आणि प्रचार करणारे ह-भ-प कीर्तनकार यांना सरकारच्या वतीने मासिक वेतन देण्यात यावे
वफ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवून त्या जागेवर अल्पसंख्यांक समुदायाच्या विकासाचा वापर करण्यात यावा
सारथी, बार्टी,महाजोति,या धर्तीवर अल्पसंख्याक मुस्लीम समुदायाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात यावी इत्यादी मागण्याचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब यांना देण्यात आले यावेळी मा. शामराव ढवळे तालुका अध्यक्ष
अॅड अशोक पोटभरे जि. उ. प्रकाश उजगरे
आवडाजी ढवळे युवा नेते
कुमार भालेराव, प्रसिद्धी प्रमुख आनंद कांबळे युवा नेते
रामभाऊ गालफाडे ता. उ. दिलिप
लहाडे ता. उ. बाबासाहेब सहजराव; विठ्ठल निसरगंध; समाधान लहाडे ;सुधाकर मनेरे;प्रतिक साळवे
इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते .