स्वस्त धान्य दुकानात रांगेत उभे न करता आधी दिव्यांगाना प्राधान्य द्या- रफिक कुरेशी

भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेतर्फे पोंभुर्णा तहसीलदारांना निवेदन
तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
शासनातर्फे दिव्यांगाना राशन मिळत असले तरी स्वस्त धान्य दुकानातून वेळोवेळी राशन मिळत नाही. तद्वतच स्वस्त दुकान दुकानदाराच्या अरेरावीमुळे तालुक्यातील दिव्यांगाशी दुजाभाव केला जातो आणि तास न तास रांगेत उभे राहून राशनाची प्रतिक्षा करावी लागते. दिव्यांग हा शारीरिकदृष्टय़ा अपंगत्व दुर्बल असल्याने खुप वेळ उभे राहने शक्य नाही. यासाठी त्यांना त्रास होऊ नये आणि दुकानद्वारे होणाऱ्या गैरवर्तनाबद्दल कारवाई व्हावी यासाठी भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना शाखा पोंभुर्णा तर्फे तहसीलदार साहेबांना निवेदनाद्वारे मागणी केली.
दिव्यांगाशी वारवांर अन्याय केल्या जात असेल अशा राशन दुकानदाराच्या विरोधात उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष रफिक कुरेशी यांनी दिला.
यावेळी संघटनेचे तालुका सचिव अविंशात अलगमवार, प्रल्हाद पाल, राजु पाटोडे, गयाबाई भाले, अरुण अल्लीवार, राजन गुरनुले इत्यादी उपस्थित होते.