वटपौर्णिमेनिमीत्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन
वटपौर्णिमेचे औचित्य साधुन शिवाजी नगर पाथरी येथे वृक्षलागवड करताना सौ भावनाताई नखाते (जिल्हा अध्यक्षा ,परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) समवेत सौ सुरेखा आमले, सौ मीराताई सरोदे, सौ उषा डुकरे, सौ सुनिता डुकरे, सौ राधा जाधव, सौ अर्चना गिराम, सौ स्वाती धर्मे, सौ शुभांगी जाधव आदी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने वृक्ष लागवडीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. या हेतूने शिवाजी नगर पाथरी, जिल्हा परभणी येथे वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधुन वृक्ष लागवड करण्यात आली या प्रसंगी परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा अध्यक्षा सौ. भावनाताई अनिलराव नखाते, सौ सुरेखा आमले, सौ मीराताई सरोदे, सौ उषा डुकरे, सौ सुनिता डुकरे, सौ राधा जाधव, सौ अर्चना गिराम, सौ स्वाती धर्मे, सौ शुभांगी जाधव आदी उपस्थित होत्या.
वटपौर्णिमेच्या निमित्त उपस्थित महिलांनी वटवृक्षाचे पुजन केले तसेच प्रातिनिधीक स्वरूपात वृक्ष लागवड केली.
वृक्षलागवडीसोबतच वृक्ष संवर्धन ही महत्त्वाचे आहे, ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटात वृक्षच आपल्याला मदत करतील असे वक्तव्य सौ भावनाताई नखाते यांनी केले.