सि.एस.टी.पि.एस.मध्ये स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना संधी देण्याची राजु झोडेंची मागणी
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चंद्रपूर (दुर्गापूर) सी. एस. टी. पी. एस. महाजनको मध्ये कित्येक कर्मचारी व कंत्राटी कामगार सेवानिवृत्त झालेले आहेत. परंतु सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांना कामावर ठेवून स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांवर मोठा अन्याय होत आहे. ठेकेदार सेवानिवृत्त झालेल्यांनाच कामावर घेत असल्यामुळे येथील स्थानिक सुशिक्षित बेरोजगार यांच्यावर जीवन कसे जगायचे असा प्रश्न पडलेला आहे. याबाबत राजु झोडे यांनी मुख्य अभियंता यांना निवेदन देऊन स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी केली आहे.
मागील काही वर्षापासून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व कंत्राटी कामगार यांचेकडूनच ठेकेदार काम करून घेत आहेत. त्यामुळे येथील स्थानिकांना रोजगारांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जुनेच कामगार असल्यामुळे सुशिक्षित युवक बेरोजगारांना कामाची संधी उपलब्ध नसल्यामुळे येथील बेरोजगार युवक हाताश झालेला आहे. सी. टी. पी. एस. प्रशासनाने तात्काळ सेवानिवृत्त कर्मचारी व कंत्राटी कामगार यांचा गेट पास रद्द करून येथील स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची व कामाची संधी उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी उलगुलान विद्युत कामगार संघटनेकडून मुख्य अभियंता यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. सी. टी. पी. एस. प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर याबाबत येथील स्थानिक युवक बेरोजगार या विरोधात आक्रमक पवित्रा घेऊन तीव्र आंदोलन करणार असा इशारा सीटीपीएस प्रशासनाला राजू झोडे यांनी दिला आहे.निवेदन सादर करताना संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, दुर्गापुर शाखा अध्यक्ष रवी पवार , गुरु भगत या शिवाय संघटनेचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.