जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

प्रतिनिधी:राहुल गहुकर
चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि. 10 मार्च 2024 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला काजल ठवरे व भावना शेंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.
याप्रसंगी प्रदिप मेश्राम यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी कष्ट सोसून स्त्रियांना शिक्षणाचे दार उघडून दिले. आज स्त्रिया सर्व क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. ही सर्व किमया केवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच घडली. सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षित केले. आज महिलांनी उमेद व ग्रामसंघ तथा बचत गटाच्या माध्यमातून मोठी प्रगती केली आहे. ही सर्व किमया केवळ सावित्रीबाई फुले मुळेच घडली. महिलांनी सावित्रीबाई फुले यांचे विचार अंगीकृत करून सर्वत्र प्रगती करावी. सावित्रीबाई फुले यांचे विचार व कार्य सर्वांसाठी प्रेरणादायीच आहेत अशा शब्दात मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचं स्मरण त्यांना अभिवादन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप मेश्राम यांनी केले व आभार योगेश मेश्राम यांनी मानले. यावेळी भिमज्योती महिला मंडळ, बौध्द पंच कमेटी मालेवाडा तथा गावातील नागरिक उपस्थित होते.