प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोज बुधवार ला प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे जिल्हा परिषद चंद्रपूर तथा प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी आणि अवंती ऑप्टिकल्स चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर घेण्यात आला या शिबिरात नेत्र तपासणी नेत्रचिकित्सक डॉक्टर मेहुल जोशी यांनी केली. यात एकूण 515 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. तसेच सर्व लाभार्थ्यांना चष्मे देण्यात आले. आणि102 लाभार्थ्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

सदर शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंगर , डॉक्टर मनोज तेलमासरे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्त कर्मचारी अशा स्वयंसेविका तसेच अवंती ऑप्टिकल चंद्रपूर यांच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
सदर शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्या सहकार्याने यशस्वी पार पडले.