सार्वजनिक दसरा उत्सव समिति भिसी व्दारा आयोजित दसरा शोभायात्रेतील कलाकारांचा सन्मान

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चिमूर तालुक्यातील मौजा भिसी येथे दिनांक ३१ आक्टोंबर २०२३ ला घेण्यात आलेल्या सन्मान सत्कार कार्यक्रमात एकंदरीत १७ कलाकारांचा सन्मान करण्यात आला. शोभायात्रेत सहभागी झालेले रामा च्या भूमिकेत (जय मुंगले),लक्ष्मण च्या भूमिकेत(सक्षम कोसरे),सिता च्या भूमिकेत (कृष्णांकी गभणे),लव(मयंक ठोंबरे) कुश (इशांत मेश्राम)विष्णु(मयुर कामडी) शंकरजी (सुनिल गोहणे)दुर्गादेवी(विजयालक्ष्मी भाकरे) शारदा देवी(खुशी डोंगरे) कृष्ण(नैतिक उपरकर) झाशीची राणी लक्ष्मीबाई (लक्ष्मी शेडमाके) हनुमान (महेश उघडे) तंट्याभिल(अमोल मेश्राम) वाघ (धिरज रोकडे)सारथी (प्रमोद डोंगरे) छत्रपती शिवाजी महाराज (निखील मुंगले) गणपती (आरंभ डोंगरे) अश्या विविध भुमिका साकार केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मान डोंगरे पाटील वाडा येथे करण्यात आला

ह्या सार्वजनिक दसरा उत्सव समिति च्या मागणीची दखल घेऊन डंम्पींग यार्ड दुसरीकडे हलवुन रामलिला मैदान साफ करुन दिल्याबद्दल नगरपंचायत कार्यालय भिसी चा अभिनंदनाचा ठराव घेऊन सन २०२३ चा दसरा उत्सवाचा जमाखर्च ताळेबंद अहवाल सादर करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन विजयभाऊ घरत सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, प्रमुख पाहुणे हरिजी नगराळे सुरेशजी डोंगरे, रंधवा भाकरे आदि मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश भुरके तर प्रास्ताविक प्रदिप कामडी व आभार सुरेंद्र घरत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक दसरा उत्सव समिति च्या पदाधिकाऱ्यानी मोलाचे कार्य केले. कार्यक्रमाला परिसरातील समस्त नागरिक व युवक मंडळी उपस्थित होती.
